आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tatiana's Injury Could Not Stop The Flight Of Chernobyl

किरणोत्सर्गाने पीडित युवती जगात मॅरेथॉनमध्ये अव्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२९ वर्षांनंतर असे आहे "चेर्नोबिल'
चेर्नोबिल शोकांतिकेवर स्वेतलाना अॅलेक्सेविच यांनी केलेल्या लिखाणाला नुकतेच साहित्याचे नोबेल मिळाले. २६ एप्रिल १९८६ रोजी युक्रेनच्या अणुभट्टीमध्ये जबरदस्त स्फोट झाला होता. त्यातून किरोत्सर्जन मोठ्या प्रमाणात झाले. याचा दुष्परिणाम सोव्हिएत रशियापासून ते युरोपपर्यंत सर्वांना भोगावा लागला. या स्फोटात ४ हजार जणांचा बळी गेला. साडेतीन लाख लोक स्थलांतरित झाले. मात्र याचे विपरीत परिणाम आजतागायत कायम आहेत. किरणोत्सर्जनाने अनेक अपत्ये अपंग जन्माला येत आहेत. या स्फोटाच्या ४ वर्षांनंतर बेलारूसमध्ये तात्सियानाचा जन्म झाला होता. तिला पाहताच पालकांनी तिला अनाथाश्रमात टाकले. मात्र तात्सियानाची जगण्याची उमेद कायम होती.

२९ वर्षांपूर्वी चेर्नोबिल अणुभट्टी स्फोटाने अनेक जीवनांच्या आशा संपुष्टात आणल्या. स्फोटांच्या वेळी तात्सियाना झिवत्सकोचा जन्मही झाला नव्हता. किरणोत्सर्जनामुळे ती अपंगच जन्माला आली. उजव्या हाताला एक तर डाव्या हाताला केवळ ३ बोटे होती. तिला एका कुटुंबाने अनाथाश्रमातून दत्तक घेतले. शारीरिक मर्यादांमुळे तिने कधी कच खाल्ली नाही. गुडघ्यांच्या आधारे चालू लागली. नंतर तिला कृत्रिम पाय लावण्यात आले. या पायांच्या बळावर तिने नव्याने झेपावण्याचा निश्चय केला. तिने चक्क मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. तात्सियानाने विजेतेपद पटकावले.

पुढील स्लाइडवर पाहा, तात्सियाना झिवत्सकोचा फोटोज...