आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीसीएस, इन्फोसिसवर आरोप, या कंपन्यांनी एच-1 बी व्हिसाचा गैरवापर केला : अमेरिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेने एच-१ बी व्हिसावरून टीसीएस, इन्फोसिस आणि कॉग्निझंटसारख्या भारतीय कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिका आजवर लॉटरी पद्धतीने हे व्हिसा देत आली आहे. ट्रम्प प्रशासनाचा आरोप आहे की, या भारतीय कंपन्या मोठ्या संख्येने अर्ज करतात. यामुळे लॉटरीत त्यांच्या नावाचे ड्रॉ जास्त निघतात. हा यंत्रणेचा गैरवापर असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. याऐवजी आता मेरिटच्या अाधारे व्हिसा जारी करण्याची पद्धत अवलंबली जाईल.
 
८०% वेतन कमी मिळते 
अमेरिकी अधिकाऱ्याचा दावा आहे की, एच-१ बी व्हिसाअंतर्गत जे लाेक अमेरिकेत येतात, त्यांना या कंपन्या ६०-६५ हजार डॉलर्स वार्षिक वेतन देतात. दुसरीकडे, सिलिकॉन व्हॅलीत सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचे सरासरी वेतन दीड लाख डाॅलर्सपर्यंत आहे. या व्हिसावर काम करणाऱ्या ८०% लोकांना या कंपन्या सरासरीपेक्षा कमी वेतन देतात. हे व्हिसाच्या सिद्धांताविरुद्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...