आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी बॅग नाकारल्याने जगभरात टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ग्राहकाला अतिरिक्त टी बॅग नाकारल्यामुळे कसे नुकसान होते ते मार्क्स अँड स्पेंसर यांना जाणवत असावे. त्याने वयोवृद्ध दांपत्याला अतिरिक्त टी बॅग देण्यास नकार दिला होता. दांपत्याने ही बाब नातेवाइकांना सांगितली. यानंतर सोशल मीडियावर जगभरातील लोकांनी स्टाेअरचालकावर तीव्र हल्ला चढवला.
प्रकरण आठवडाभर चालले. बायर्न दांपत्याने मार्क्स अँड स्पेन्सरच्या ब्लँकर्ड््स टाऊन येथील शाखेत गेले. तिथे त्यांनी चहाची ऑर्डर दिली. चहा आला मात्र, त्याची चव आधीच्या सारखीच होती. त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावले आणि चहा कमी कडक असल्याचे सांगितले. आम्हाला आणखी एक टी बॅग द्या, अशी त्यांनी मागणी केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यासाठी तुम्हाला पुन्हा ऑर्डर द्यावी लागेल, असे सांगितले. या दांपत्याने सुपरवायजरला बोलावले. त्याचे उत्तरही वेगळे नव्हते. तो म्हणाला, तुम्हाला दुसऱ्या पॉटसाठी पैसे अदा करावे लागतील. ही बाब त्यांची मुलगी मेरी बायर्नला पटली नाही. तिने स्टोअरच्या फेसबुक पेजवर आपला राग काढत लिहिले की, माझे ७८- ८० वर्षांचे वयोवृद्ध आई-वडील स्टोअरमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. मी आणि माझे मित्र, संबंधित लोक,व्यवसायातील सहकारी तुमचे नियमित ग्राहक आहेत. मात्र, आता यापुढे असणार नाहीत.
Poll Widget Placeholder
बातम्या आणखी आहेत...