आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

America : विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करणा-या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उटाह - अमेरिकेच्या एका कोर्टाने एका हायस्कूलच्या शिक्षिकेला तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपी ठरवले आहे. तिला 2 ते 30 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 36 वर्षांची ब्रायन एल्टिस सॉल्टलेक सिटी येथे एका हायस्कूलमध्ये इंग्रजी शिकवायची. शाळेतीलच 16 ते 17 वयोगटातील तीन विद्यार्थ्यांशी शारिरीक संबध ठेवल्याचा आरोप तिच्यावर होता. कोर्टात सुनावणी सुरू असतानाच ब्रायनला रडू कोसळले. दया करण्याची विनंतीही ती करत होती. अमेरिकेत अल्पवयीन मुलांशी शारिरीक संबंध ठेवणे हा गंभीर गुन्हा समजला जातो.

जामीनावर असतानाही ठेवले संबंध
कोर्टात वकिलांनी सांगितले की, ब्रायनने एका 16 वर्षांच्या आणि दोन 17 वर्षांच्या मुलांशी संबंध ठेवले. सुनावणीदरम्यान तिला आधी जामीन देण्यात आला होता. पण त्यादरम्यानही तिने या मुलांशी संबंध ठेवणे सुरू ठेवले. हे समजल्यावर तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

मुलांचे किती नुकसान झाले हे ब्रायनला कळणारही नाही असे, पीडित मुलाच्या आईने कोर्टात जबाबात सांगितले. त्याचबरोबर तिने सर्व मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. त्यावर मुले रोज तिचा पाठलाग करायचे आणि तिची छेडछाडही करायचे असे ब्रायनने सांगितले. पण याकडे लक्ष न देता तिने आपले काम करायला हवे होते, असा युक्तीवाद वकिलांनी केला. या प्रकरणी शाळेवरही खटला दाखल करण्यात आला आहे. शाळेला सर्व माहिती असूनही शाळेने कारवाई का केली नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुनावणीदरम्यानचे ब्रायनचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...