आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू विद्यार्थ्याला स्वत:ची यूरिन प्यायला सांगितले, मुस्लिम शिक्षकाचा प्रताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सेकालाह रेंदेह केबांगसान इब्राहिम स्कूल) - Divya Marathi
(फाइल फोटो: सेकालाह रेंदेह केबांगसान इब्राहिम स्कूल)
कुआलालम्पुर- मलेशियातील एका शाळेत मुस्लिम शिक्षकाने तहान लागलेल्या हिंदू विद्यार्थ्याला लघवी (यूरिन) प्यायचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. केदाह राज्यातील संगई पेटानी शहरातील सेकालाह रेंदेह केबांगसान इब्राहिम स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकाची चौकशी सुरु केली आहे. आपण विद्यार्थ्याची गंमत केल्याचे आरोपी शिक्षकाने म्हटले आहे. क्लास सुरु असताना एका हिंदू विद्यार्थ्याला पाण्याची तहान लागली. त्याने शिक्षकाला पाणी मागितले. त्यावर शिक्षक त्याच्यावर संतापले आणि विद्यार्थ्याला टॉयलेटमधील बाऊलमधील पाणी पी अथवा स्वत:ची लघवी पी, असे खडसावले. यावर संतप्त पालकांनी शाळेवर पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.

रमजान महिना सुरु आहे. मुस्लिम बहुल मलेशियात बहुतांशी मुस्लिम रोजे धरतात. दिवस मावळल्याशिवाय रोजेदार काहीही खात-पित नाहीत. या पार्श्वभूमीवर सुंगई पेटानी येथील सेकालाह रेंदेह केबांगसान इब्राहिम स्कूलमधील पिण्याचे पाणी काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे गैर-इस्लामिक विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.

शाळेत 40 टक्के विद्यार्थी गैर-इस्लामिक
एका विद्यार्थ्याची आई कविथा सोमली यांनी सांगितले की, इब्राहिम स्कूलमध्ये 40 टक्के विद्यार्थी हे गैर-इस्लामिक आहे. त्यात हिंदू विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे.

मंत्री म्हणाले, हे आमचे धोरण नाही...
उपशिक्षण मंत्री पी कमलनाथन यांनी केदाह शिक्षण विभागाला याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. रमजान महिन्यात शाळांमध्ये गैर-इस्लामिक विद्यार्थ्यांना पाणी न देण्याची आमचे धोरण नाही. मात्र, मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर काहीही खाऊ-पिऊ नये, असे आवाहन गैर-इस्लामिक विद्यार्थ्यांना करण्‍यात आल्याचे पी कमलनाथन यांनी सांगितले आहे. दरम्यान, रमजानच्या काळात मलेशिया येथील बहुतांशी सार्वजनिक संस्था, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील कॅंटीन बंद करण्यात येतात. त्यामुळे गैर-इस्लामिक विद्यार्थ्यांना काहीही खाण्या-पिण्यासाठी शॉवर रुमचा वापर करावा लागत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पालकांनी मुस्लिम विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची प्रत...