आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत असा होता हा हुकूमशहा; वर्गमित्र, शिक्षकांनी सांगितले किस्से

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हायड्रोजन बॉम्ब चाचणीवरून पुन्हा चर्चेत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर 2011 मध्ये त्याने देशावर नियंत्रण मिळवले. जगातील सर्वात कुख्यात हुकूमशहांपैकी तो एक आहे. शाळेत असताना तो कसा होता याचे किस्से त्याच्या स्वित्झरलँड येथील शिक्षकांनी सांगितले आहेत. 
 

बास्केटबॉलचा चाहता
- स्वित्झरलँडच्या कोएनिज येथील लिएबेफेल्ड-स्टेनहोल्जी पब्लिक स्कूलमध्ये त्याने प्राथमिक शिक्षण घेतले आहे. या शाळेतील शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे, त्याला बास्केटबॉल खूप आवडत होते. 
- शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे, किम 1991 मध्ये 7 वर्षांचा असताना स्वित्झरलँडच्या शाळेत दाखल झाला होता.  
- शाळेत किम अतिशय महत्वाकांक्षी आणि हार्ड वर्किंग होता. तसेच जर्मन भाषा खूप चांगल्या प्रकारे बोलत होता.
- स्वित्झरलँडमध्ये किमच्या शिक्षिका री सू योंग होत्या. त्या सध्या 77 वर्षीय आहेत. तसेच त्यावेळी त्या उत्तर कोरियाच्या राजदूत होत्या.
 

नाव बदलून घेतले शिक्षण
- माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन चा जन्म 1982 मध्ये झाला. मात्र, अमेरिकेच्या कागदपत्रानुसार, त्याचा जन्म 8 जानेवारी 1984 रोजी झाला. 
- किमने स्विटजरलँडच्या कोरियन दूतावासात स्टाफचा मुलगा म्हणून शाळेत प्रवेश घेतला होता. शाळेत त्याचे नाव बदलून पाक उन असे ठेवण्यात आले होते. ही शाळा इंग्रजी भाषेतील शाळा होती. 
- किमच्या माजी वर्गमित्रांनी सांगितल्याप्रमाणे, किम वर्गात खूप साधा-भोळा मुलगा होता. तो वर्गात आपल्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखला जात होता. 
- फॉर्मर क्लासमेट माइक्रो इम्होफने म्हटल्याप्रमाणे, किम अतिशय हसऱ्या स्वभावाचा मुलगा होता. तो नेहमीच थट्टा-मस्करी करत होता. सर्वांना चांगली वागणूक देत होता. मग, तो कुठल्याही देशातील मुलगा असो.
- दुसऱ्या एका क्लासमेटने सांगितले, की शाळेत एक टॅबू विषय होता. त्यामध्ये केवळ फुटबॉलवर चर्चा होत असे. राजकारणावर चर्चा करण्यास तेथे सक्त मनाई होती. 
- लहानपणापासूनच जाड-जूड असलेल्या किमची हाइट 5.6 फूट आहे. तरीही तो बास्केटबॉलचा उत्तम खेळाडू होता. मायकल जॉर्डन त्याचा आयडल होता.
 

पुढील स्लाइडवर पाहा, मिलिट्री स्कूल पोहोचण्यापासून सुप्रीम लीडर बनण्याचा प्रवास...
बातम्या आणखी आहेत...