आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS सदस्याची वधू होण्यासाठी ती जर्मनीतून पळाली होती, वर्षभरानंतर इराकमध्ये झाली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीच्या डाय वेल्ट दैनिकाने इराकमध्ये पकडण्यात आलेली मुलगी लिंडा वेनझेल असल्याचा दुजोरा दिला आहे. - Divya Marathi
जर्मनीच्या डाय वेल्ट दैनिकाने इराकमध्ये पकडण्यात आलेली मुलगी लिंडा वेनझेल असल्याचा दुजोरा दिला आहे.
मोसूल - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना इसिसच्या सदस्याची वधू होण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलीला मंगळवारी इराक पोलिसांनी पकडले आहे. लिंडा वेनझेल असे त्या मुलीचे नाव असून ती गेल्या वर्षी जर्मनीच्या ड्रेस्डन येथून सीरियात पसार झाली होती. 2016 मध्ये ती ऑनलाईन चॅटिंग करताना इसिस दहशतवाद्याच्या प्रेमात पडली होती. इसिस आणि इराकी सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या 10 महिन्यांच्या धुमश्चक्रीनंतर मंगळवारी 20 जणांना पकडण्यात आले आहे. त्यामध्ये या मुलीचा देखील समावेश आहे. 
 
 
जर्मन दैनिकाने दिला दुजोरा
- इराकी पोलिसांनी मंगळवारच्या धाडीत एकूण 20 जणांना पकडले आहे. त्यामध्ये रशियन, जर्मन, तुर्की आणि कॅनडासह विविध देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. त्या सर्वांना इसिसचे समर्थक म्हटले जात आहे. 
- जर्मनीच्या डाय वेल्ट दैनिकाने इराकमध्ये पकडण्यात आलेली मुलगी लिंडा वेनझेल असल्याचा दुजोरा दिला आहे. ती 2016 मध्ये फ्रँकफर्ट येथून बेपत्ता होती. 
- जर्मनीतील वकील लॉरेन्झ हासे यांनी सांगितल्याप्रमाणे, बेपत्ता मुलीचा शोध लागल्याने आता या तपासाला नवे वळण लागले आहे. जर्मनीत हरवलेली मुलगी तीच असल्याची खात्री पटल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे. 
 
 
अशी अडकली इसिसच्या जाळ्यात
- जर्मनीच्या ड्रेस्डन प्रांतातील पुलस्नित्झ शहरात राहणारी लिंडा घरात एकटेपणाला कंटाळली होती. त्याचवेळी तिचे ऑनलाईन चॅटिंगमध्ये मन लागले.
- याच दरम्यान, तिची मैत्री सीरियातील एका युवकाशी झाली. दररोज चॅटिंग होत असताना मैत्री प्रेमात बदलली. स्वतःला मुस्लिम म्हणवून घेणाऱ्या युवकाने तिचे मन वळवले आणि धर्म परिवर्तन करण्यास फूस लावली. 
- काही दिवसांतच लिंडाने आपले नाव बदलून मरियम ठेवले. तसेच घरात आणि इतर ठिकाणी जात असताना स्कार्फ वापरण्यास सुरुवात केली. यावरून घरी वाद देखील झाला. 
- तिच्यासोबत दररोज चॅट करणारा युवक प्रत्यक्षात कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस / इसिस) चा सदस्य होता. त्याने चॅटिंगवरूनच लिंडा हिला भडकावण्यास सुरुवात केली. तसेच लग्नाचे अमीष देऊन सीरियात बोलावले. 
- यानंतर 2016 मध्ये लिंडाने फ्रँकफर्ट (जर्मनी) ते तुर्कीची फ्लाईट पकडली. विमानतळ आणि बँकेत पैसै काढण्यासाठी सुद्धा तिने आपल्या आईच्या नावाचा गैरवापर केला. यानंतर तुर्कीहून ती सीरियाला रवाना झाली.
बातम्या आणखी आहेत...