आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिम्बाब्वेत मुगाबे यांची सत्ता संपुष्टात, सरकारी वृत्तवाहिन्यांवर लष्कराचा ताबा तर रस्त्यावर मिल्ट्री राज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका मिनीबसवरील मुगाबे यांचे चित्र पुसतांना एक मुलगा - Divya Marathi
एका मिनीबसवरील मुगाबे यांचे चित्र पुसतांना एक मुलगा
हरारे - झिम्बाब्वे सध्या राजकीय संकटात अडकलेला आहे. सरकारी वृत्तवाहिन्यांवर लष्कराने ताब्यात घेतल्यानंतर सत्तापालट निश्चित झाला आहे. झिम्बाब्वेची राजधानी हरारेमध्ये अध्यक्षांच्या घराजवळ भीषण गोळीबारी आणि स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले. त्यामुळे आता अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची सत्ता संपुष्टात आलेली आहे. यामागे झिम्बाब्वेचे उपाध्यक्ष इमर्सन यांचा हात असल्याची शक्यता व्यक्त होतेय. आता सत्तापालट झाल्यावर झिम्बॉब्वेची राजकीय सूत्रेही लवकरात लवकर त्यांच्याच हाती येणार आहेत.
 
शहरात जिकडेतिकडे लष्कर आणि मिलट्री टँक पाहायला मिळताहेत. मात्र लष्कराने सत्तापालट होण्याच्या शक्यतेला धुडकावून लावले आहे. लष्कराचे म्हणणे आहे की, अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे बिलकुल सुरक्षित आहेत. ही कारवाई गुन्हेगारांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आलेली आहे. मुगाबेच्या पक्षाने सेनाप्रमुख जनरल कॉन्सटेनटिनो चिवेंगा यांच्यावर मागील आठवड्यात देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
 
लष्कराने काय म्हटले आपल्या वक्तव्यात...
- राजधानी हरारेमध्ये मोठ्या संख्येने लष्करी जवान तैनात असून त्यासोबत मिलट्री टँकही दिसताहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अध्यक्षांच्या खासगी निवासस्थनाजवळ गोळीबाराचा आवाज ऐकायला आला.
- राष्ट्रीय ब्रॉडकास्टर झेडबीसीवर मेजर जनरल सिबुसिसो मोयो यांनी सांगितले की, आम्ही आमच्या नागरिकांना विश्वासात घेऊन सांगू इच्छित आहोत की, अध्यक्ष आणि त्यांचे कुटूंबिय सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतली आहे.
- गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी लष्कराकडून कारवाई करण्यात येत आहे. देशातील बिघडलेल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीला तेच जबाबदार आहेत. जेवढ्या लवकर मिशन पूर्ण होईल, तितक्या लवकर वातावरण सर्वसामान्य होईल.
- लष्कराने सर्वसामान्य नागरिकांना शांत राहण्याची विनंती केली आहे. न्यायव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही, असा विश्वासही सेनेने दिला आहे.
- लष्कराने सुरक्षाबळाला सांगितले कली, देशाच्या सुरक्षिततेसाठी लष्कराला मदत करावी. त्याशिवाय मिलट्री फोर्सच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- दुसरीकडे झिम्बाब्वेचे दूतावास इसाक मोयो यांनीही सत्तापालटच्या चर्चेला नाकारले आहे. 
 
मुगाबे यांच्याकडून स्पष्टीकरण नाही...
- लष्कराच्या स्पष्टीकरणात ज्यांच्यावर निशाणा साधायचा आहे, त्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. सरकारी वृत्तसंस्थ रॉयटर्सने सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये वित्तमंत्री इग्नाटिअस कोम्बो यांचा समावेश आहे.
- या स्थितीत हे स्पष्ट होऊ शकले नाही की, या कारवाईचे नेतृत्व कोणी केले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा - झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील कारवाईचे फोटो
बातम्या आणखी आहेत...