आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका आणि उ. कोरियाचा संपर्क कायम संपुष्टात येणार, 200 अमेरिकी मायदेशी परतणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी नागरिक उत्तर कोरियामध्ये राहणाऱ्या २०० स्वदेशी नागरिकांविषयी अनभिज्ञ आहेत. स्थानिक सरकार यांच्यावर नजर ठेवून आहे. ते अनेक वर्षांपासून येथे शिक्षण, आरोग्य व इतर क्षेत्रांत काम करत आहेत. अॅशव्हिले येथिल हेदी लिंटन ख्रिश्चियन फ्रेंडस ऑफ इंडिया संघटनात प्रमुख पदी आहेत. १९९५ पासून उ. कोरियाला कोट्यवधींचा निधी त्यांनी मिळवून दिला. वर्षातील ३ महिने त्या येथे राहतात. हिपॅटायटिस आणि ट्यूबरक्युलोसिस सेंटरची मदत करतात.
 
अमेरिकनांद्वारे संचालित प्योंगयांग विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आहे. येथील विद्यार्थी व शिक्षक नियमांचे काटेकोर पालन करतात. धर्म व राजकारणावर ते बोलत नाहीत. उ. कोरियात राहणाऱ्या अमेरिकींना राजनयिक तज्ज्ञ दोन्ही देशांतील संपर्काचे महत्त्वाचे माध्यम मानतात. दोन्ही देशांदरम्यान व्यावसायिक व मुत्सद्देगिरीचे संबंध संपले आहेत. त्यामुळे मानवाधिकार कारणांसाठी राहणाऱ्यांचे वास्तव्य हा एकमेव दुवा आहे.  

आता परिस्थिती कायमस्वरूपी बदलू शकते. आेट्टो वार्मबियर या विद्यार्थ्याचा  उ. कोरियाच्या तुरुंगात असताना मृत्यू झाला. सैन्यातील तणाव वाढत आहे. ट्रम्प यांनी १ सप्टेंबरपासून उ. कोरियाच्या पासपोर्टवर बंदी आणली आहे. अमेरिकी नागरिकांच्या जिवाची जोखीम यामुळे वाढेल, असे सांगण्यात आले. उ. कोरियात राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांवरचे संकट यामुळे वाढले. यात ख्रिस्ती धर्माचे प्रसारक आहेत. नव्या प्रवास बंदीविषयी ते बोलत आहेत.
 
उ. कोरियामध्ये जागतिक संस्थेसाठी २० वर्षांपासून काम करणारे फ्रँकलिन ग्रॅहम म्हणतात की, राष्ट्राध्यक्षांनी यावर स्पष्ट निर्णय घ्यावा. देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. मदत न देण्याच्या निर्णयाची मोठी किंमत अमेरिकेला चुकवावी लागेल. येथे अमेरिकेकडून मानवीय मदतीची सुरुवात ९० च्या दशकात झाली होती. येथे त्या वेळी दुष्काळ पडला होता. युनिसेफ, मर्सी क्रॉप्स, वर्ल्ड व्हिजनसारख्य संघटना खाद्यान्नाचा पुरवठा करत. नंतर ख्रिस्ती मिशनरी येथे आले. त्यांनी येथे जम बसवला.
 
मात्र, नुकत्याच घडलेल्या घटनांतून सिद्ध होते की, अमेरिकनांसाठी आता येथे सुरक्षित वातावरण नाही. गेल्या १० वर्षांत येथे १७ अमेरिकनांना कैदेत टाकले होते. त्यांच्याविरुद्धचे आरोपही सांगण्यात आले नव्हते. तरीही ते उ. कोरियाला परत जाण्यासाठी ट्रम्प प्रशासनावर दबाव टाकत आहेत. संरक्षण मंत्रालय काही सूट देऊ शकते. मात्र, याच्या पूर्वअटी अद्याप स्पष्ट नाहीत. अमेरिकी विद्यार्थ्यांच्या गुढ मृत्यूनंतर उभय देशातील संबंध ताणले गेले.
बातम्या आणखी आहेत...