आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमधून पाहा, हजच्या भाविकांसाठी वसवले दीड लाख फायरप्रूफ तंबूंचे शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीनामध्‍ये हजच्या भाविकांसाठी वसवले गेले तंबूंचे शहर - Divya Marathi
मीनामध्‍ये हजच्या भाविकांसाठी वसवले गेले तंबूंचे शहर
मीना - हे छायाचित्र सौदी अरेबियाच्या मीना शहराचे आहे. ये‍थे जगभरातून येणा-या 18 लाख हज भाविकांच्या मुक्कामासाठी फायर प्रूफ तंबूचे शहर तयार करण्‍यात आले आहे. जवळपास दीड लाख तंबू लावले गेले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मीनामध्‍ये तीन लाख भाविक कमी आले आहेत. यात्रा शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. सर्वात हायटेक सुरक्षा व्यवस्थेचा दावा...
गेल्या वर्षी शैतानाला दगड मारताना चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यात जवळपास 2 हजार 300 लोकांचा मृत्यू झाला. पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून सौदीने आता सर्वात हायटेक सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचा दावा केला आहे. यासाठी अमेरिका, इस्रायलच्या सुरक्षा संस्थांची मदत घेतली आहे.
हायटेक सुरक्षा :
प्रत्येक व्यक्तीला ट्रॅक करण्‍यासाठी दिले गेले ब्रेसलेट
- सर्व हज भाविकांच्या हातात इलेक्ट्रॉनिक ब्रेसलेट लावण्‍यात आले आहे.
- या ब्रेसलेटमध्‍ये जीपीएस व भाविकांशी संबंधित पूर्ण माहिती आहे.
- तसेच गस्तीसाठी हेलिकॉप्टर व ड्रोन तैनात केले गेले आहे.
- महत्त्वाच्या ठिकाणी पाच हजार कॅमेरे बसवण्‍यात आले आहे.
- याच्या निगराणीसाठी मास्टर कंट्रोल रुम तयार करण्‍यात आले आहे.
- गेल्या आठवड्यात एक हजारांपेक्षा जास्त हेल्थ व सुरक्षा प्रशिक्षण कॅम्प चालवले गेले.
- 26 हजार जणांची वैद्यकीय टीम तैनात करण्‍यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...