आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrapin Farm Manager Executed After Kim Jong Un Visit

झिंग्यासाठी मृत्यूदंड, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांचे फर्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियामधील हुकूमशहा किम जोंग उनने कासव पाळणाऱ्या एका फार्म मालकाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. किम जोंग उन यांनी यंदा मे महिन्यात या फार्मचा दौरा केला होता. त्यावेळी फार्ममध्ये झिंगे (लहान आकारातील मासे) नसल्यामुळे किम त्या फार्मच्या मालकावर नाराज होते.

डेली नॉर्थ कोरियातील वृत्तानुसार मेमध्ये झालेल्या दौऱ्यानंतर टेडोंगगँग टेरपिन फार्मच्या मालकावर किम जोंग उन चांगलेच नाराज होते. फार्मच्या टँकमध्ये स्वच्छता नसल्यामुळे अनेक लहान कासव मेल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी फार्मच्या मालकावर कासवांची योग्यरित्या देखभाल न केल्याचा आरोप लावला.

या फार्ममध्ये कर्मचाऱ्यांना दिवंगत किम जोंगल इल यांच्या महानतेबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र रूम नसल्यामुळे त्यांच्या नाराजीमध्ये भर पडली. याबाबत त्यांनी फार्मच्या मॅनेजरला चेतावणीही दिली होती. उन यांचे वडील आणि नॉर्थ कोरियाचे पूर्वीचे नेते किम जोंग इल अॉक्टोबर 2011 मध्ये या फार्ममध्ये आले होते. दौऱ्यात ते म्हणाले होते की, कोरियाच्या डिक्शनरीमध्ये 'अशक्य' हा शब्दच नाही.

उन यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाने दोन वर्षांपूर्वी फार्ममध्ये झिंगे पाठवले होते. त्यांची ब्रीडिंग करूव उत्पादन वाढवायचे होते. पण बेजबाबदारपणा आणि काचुकारपणामुळे झिंगा माशांचे उत्पादन झाले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.