आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुर्किना फासो: दहशतवादी हल्ल्यात 20 ठार, हॉटेलमध्ये UN स्टाफ ओलिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ला अल कायदा द इस्लामिक मगरिब संघटनेने केला असल्याचे मानले जात आहे. - Divya Marathi
हल्ला अल कायदा द इस्लामिक मगरिब संघटनेने केला असल्याचे मानले जात आहे.
वागडूगू - बुर्किना फासो या अफ्रिकन देशाची राजधानी वागडूगू येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 20 जण ठार झाले. दहशतवाद्यांनी एका हॉटेलमधील काही लोकांना ओलिस ठेवले आहे. हॉटेलमध्ये जास्तित जास्त संयुक्त राष्ट्राचा (यूएन) स्टाफ आणि विदेशी नागरिक आहेत. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. हल्ला अल कायदा द इस्लामिक मगरिब संघटनेने केला असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, 63 अपहृतांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार साडेसात वाजता (स्थानिक वेळ) येथील प्रसिद्ध हॉटेल स्प्लेंडिड हॉटेल बाहेर दोन कारमध्ये स्फोट झाला. तीन ते चार बुरखाधारी शस्त्रे घेऊन हॉटेलमध्ये धावले आणि बेछूट गोळीबार सुरु केला. हॉटेलमध्ये यूएन स्टाफ आणि काही विदेशी नागरिक थांबलेले होते. हे हॉटेल आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ आहे.

दहशतवादी आधी हॉटेल जवळील एका कॅफेमध्ये पोहोचले होते. सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला होता. वागडूगूयेथील एका हॉस्पिटलचे संचालक रॉबर्ट संगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात 20 जण ठार झाले आणि 15 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

रात्री साधारण एक वाजता ओलिसांच्या मुक्ततेसाठी ऑपरेशन सुरु करण्यात आले. राजधानीत हजर अमेरिकन मिलिटरीनेही ऑपरेशनसाठी मदत केली. बुर्किनो फासो येथील फ्रान्स अँबेसेडर गाइल्स तिबॉ यांनी सांगितले, की शहरार कर्फ्यू लावण्यात आला आहे. संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले ऑपरेशन अजून सुरु आहे. ओलिसांना सोडवण्यात वेळ लागू शकतो. दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार सुरु आहे.

कोणी केला हल्ला
- जिहादी नेटवर्कवर नजर ठेवून असलेल्या एका मॉनिटरिंग ग्रुपच्या माहितीनुसार, अल कायदा द इस्लामिक मगरिब संघटनेने (AQIM) हल्ला केला असण्याची शक्यता आहे.
- दुसरी एक संघटना अल-मुराबितून यांनी देखिल हल्ला करण्याची चर्चा आहे.
- AQIM आणि अल-मुराबितून यांनी गेल्या वर्षी माली येथे झालेल्या स्फोटांची जबाबदारी घेतली होती. त्यात 20 जण मारले गेले होते.

AQIM आणि अल-मुराबितून
- अल-मुराबितून ही संघटना मालीमध्ये सक्रिय आहे. त्यांचा नेता अल्जेरियाचा दहशतवादी मुख्तार बेलमुख्तार आहे.
- बेलमुख्तार याला अनेकदा मारले गेले असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये लिबियामध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात तो ठार झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कोणीही तो ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही.
- AQIM ही एक इस्लामिक दहशतवादी संघटना आहे. यांचा कार्यक्रम अल्जेरिया सरकारला संपवणे आहे.
- ही संघटना अनेक देशांमध्ये सरकारविरोधी कार्यक्रम चालवते.
- यांनी काही महिन्यांपूर्वीच यूरोप आणि अमेरिकेला लक्ष्य करण्याची घोषणा केली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कुठे आहे बुर्किना फासो...