आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाक्यात 26/11ची पुनरावृत्ती; 12 ओलिसांची सुटका, 6 अतिरेक्यांचा खात्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ल्यामध्ये जखमीवर उपचार करताना. - Divya Marathi
हल्ल्यामध्ये जखमीवर उपचार करताना.
ढाका- कोलकात्यापासून 300 किलोमीटर अंतरांवर असलेल्या बांगलादेशाची राजधानी ढाका येथे मुंबईतील 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती झाली आहे. ढाक्यात प्रसिद्ध असलेल्या 'आर्टिसन बेकरी' या रेस्तरॉमध्ये अतिरेक्यांनी हल्ला करून 60 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. त्यापैकी 12 ओलिसांना सोडवण्यात लष्कराला यश आले आहे. लष्कराने आतापर्यंत 6 अतिरेक्यांना कंठस्नान घातले असून एकाला जिवंत पकडण्यात आले आहे.

'आर्टिसन बेकरी'तील गोळीबाद बंद झाल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराचे ऑपरेशन सुरु अाहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांच्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. याला सरकारने दुजाेरा दिलेला नाही. ओलीस ठेवलेल्या नागरिकांमध्ये 20 परदेशी आहेत. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी उशिरापर्यंत कोणत्याही संघटनेने स्वीकारली नव्हती. ISIS व अल कायदा या दोन्ही दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हॉटेलमधील 30 जण हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झाले असल्याचे घटनास्थळी उपस्थित लोकांनी म्हटले आहे.

गुलशन या प्रतिष्ठित भागात हे हॉटेल आहे. याच भागात 34 देशांच्या वकिलाती असून हॉटेलमध्ये परदेशी नागरिकांची वर्दळ असते. हल्लेखोर धार्मिक घोषणा देत घुसले. त्यांची संख्या ते 10 असल्याचा अंदाज आहे. रात्री च्या सुमारास हॉटेलमधून होणारा गोळीबार कमी झाला होता. हॉटेलच्या किचनमधील कर्मचारी कसेबसे स्वत:ची सुटका करून घेऊ शकले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक बंदुकधारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

10 पोलिस ठार- तस्लिमा
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे नमूद करून हल्ल्यात दहा पोलिस ठार झाल्याचा दावा टि्वट करून केला आहे.
दोनपरदेशी नागरिक : ठारझालेल्या तिघांमध्ये इटलीच्या दोन नागरिकांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त असून रात्री उशिरापर्यंत याला पुष्टी मिळत नव्हती.
सर्व भारतीय सुरक्षित
भारतीय वकिलात गुलशन-१ भागात असून या हॉटेलपासून ही इमारत दोन किमी अंतरावर आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी सुरक्षित आहेत.
चर्चेचा प्रयत्न
दरम्यान, हल्लेखोरांशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी रात्री केला. मात्र, हॉटेलमधून गोळीबाराचे आवाज चालूच होते. हल्लेखोर हॉटेलमधून बाहेर हातबॉम्ब फेकत होते. त्यामुळे सुरक्षा दलांना कारवाई करण्यातही अडचण येत होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, हल्ल्याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...