आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनियातील विद्यापीठात गोळीबार, १५ जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैरोबी - उत्तरपूर्व केनियातील एका विद्यापीठाच्या आवारात करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात १५ जण ठार तर ६० जखमी झाले आहेत. गेरिशा शहरातील गेरिशा विद्यापीठ महाविद्यालयात पाच बंदूकधाऱ्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
दरम्यान, सोमालीच्या अल शबाब या इस्लामिक दहशतवादी संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. ऑगस्टीनी अलांगा या २१ वर्षीय विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास सर्वजण प्रार्थनेसाठी जमले हाेते. ५ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सुसज्ज शस्त्रांसह या प्रार्थनास्थळी प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली.
त्यात १५ जण जागीच ठार, तर सुमारे ६० लोक जखमी झाले आहेत. शिवाय, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना बंदूकधाऱ्यांनी बंदी बनवले आहे.

केनियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून प्राप्त माहितीनुसार, बंदूकधाऱ्यांनी या परिसरावर ताबा मिळवला आहे आणि त्यामुळे सामूहिक हत्याकांड केले जाण्याची भीती आहे. दरम्यान, वसतिगृहाच्या सुरक्षेत तैनात पोलिस आणि हल्लेखोरांत चकमक उडाली.