आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये 9/11 नंतर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, हल्लेखोराने ट्रकने 8 जणांना चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- न्यूयॉर्कमध्ये ११ सप्टेंबर २००१ नंतर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. मॅनहॅटनमध्ये अतिरेक्याने फुटपाथ व सायकल लेनवर ताशी १०० किमीच्या वेगात ट्रक चालवून लोकांना चिरडले. यात ८ जणांचा मृत्यू तर १५ जण गंभीर जखमी झाले. 
 
उझबेक नागरिक आहे हल्लेखोर
२९ वर्षांचा हल्लेखोर सैफुल्लो सायपोव्ह उझबेकिस्तानचा नागरिक आहे. अमेरिकेत तो उबेर कॅबचा ड्रायव्हर आहे. भाड्याच्या  ट्रकने त्याने हल्ला केला. 
 
ब्रिटन, स्पेन, स्वीडननंतर अमेरिका चौथा देश  
दहशतवादी आता चारचाकी गाड्यांना हत्यांसाठी शस्त्र म्हणून वापरत आहेत. अमेरिकेत प्रथमच दहशतवाद्यांनी ट्रकने हल्ला चढवला. या वर्षीचा हा जगातील सहावा दहशतवादी हल्ला आहे. यात ट्रक, व्हॅन किंवा कारचा वापर झाला आहे. इतर पाच हल्ले युरोपच्या ब्रिटन, स्पेन आणि स्वीडनमध्ये घडवले गेले. या वर्षी सर्वाधिक ३ हल्ले लंडनमध्ये घडवले. अशा पद्धतीचा पहिला मोठा हल्ला जुलै २०१६ मध्ये फ्रान्सच्या नीस शहरात झाला होता.
 
३१ अाॅक्टाेबरला दहशत पसरवा...  
दहशतवादी संघटना अायएसच्या फ्रेंच ग्रुपने मॅनहटनमधील हल्ल्यापूर्वी पाेस्टर जारी केले हाेते. या पाेस्टरवर फ्रेंच भाषेत लिहिले  की, ३१ अाॅक्टाेबरला दहशत पसरवा. हे पाेस्टर फ्रेंच ग्रुप सेंटर मेदियातिक अनुरने जारी केले हाेते. हे सेंटर अायएसचे मासिक ‘रुमियाह’ प्रकाशित करते. यात लंडन, पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यांचे काैतुक केले. 
 
दहशतवादी १०० किमी वेगाने सायकल ट्रॅकवर 
२३ वर्षीय बाबटुंडे अाेगुनियी संगणक विज्ञानाचा विद्यार्थी अाहे. ताे मॅनहटनमध्ये राहताे. ट्रक लाेकांना चिरडत असताना ताे घटनास्थळी हाेता. त्याने सांगितले, मी महाविद्यालयाबाहेर बसलाे हाेताे. मी एक ट्रक ताशी १०० किमी वेगाने लाेकांना चिरडत असल्याचे पाहिले. तसेच चालकाने ट्रक सायकल ट्रॅकवर घातला. काय झाले, हे पाहण्यासाठी नागरिक ट्रककडे धावले. काही अंतरावर गाेळीबाराचा अावाज अाला. माझ्या डाेळ्यांवर माझा विश्वासच बसला नाही, मी सुन्न झालाे हाेताे.   
 
 
२०१६ मध्ये ट्रकने दाेन हल्ले  
बर्लिन : ट्रक- डिसेंबरमध्ये जर्मनीच्या बर्लिनमधील ख्रिसमस मेळ्यात दहशतवादी ट्रक चालवत घुसला. त्यात १२ जण ठार, तर ४८ नागरिक जखमी झाले हाेते.  
नीस : ट्रक- १५ जुलै २०१६ला फ्रान्सच्या नीस शहरात बास्तिल डे साजरा करणाऱ्या लाेकांना २ किमीपर्यंत चिरडत  ट्रक निघून गेला. ८६ ठार, तर ४६३ जखमी.
 
मॅनहटनमध्ये हल्ला झाला तेथून काही अंतरावर १० हजार नागरिक हॅलाेविनसाठी एकत्र येणार हाेते.
बातम्या आणखी आहेत...