आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारच्या देशात पोसला जाताेय दहशतवाद - नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेने आण्विक पुरवठादार गटात सहभागी होण्याच्या मुद‌्द्यांवर पाठिंबा दिल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला कडक इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी संसदेत बोलताना पाकचे नाव न घेता आपल्या शेजारी देशात दहशतवाद पोसला जात असल्याचे सांगून या दहशतवादाविरुद्ध भारत-अमेरिका सहकार्याची गरज प्रतिपादित केली.

बुधवारी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात मोदींचे भाषण झाले. या सभागृहात भाषण करणारे मोदी सहावे भारतीय पंतप्रधान ठरले. टाळ्यांच्या कडकडाटात सदस्यांनी मोदींचे स्वागत केले. भाषण सुरू होईपर्यंत या टाळ्या सुरूच होत्या. भाषणातही मोदींनी टाळ्या मिळवल्या. विषय दहशतवादाचा असो, किंवा भारत-अमेरिका मैत्रीचा, या प्रत्येक मुद‌्द्यांवर सदस्यांनी मोदींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दहशतवाद वेगवेगळ्या नावाने जगभर विनाश घडवत असल्याचे मोदी म्हणाले. तत्पूर्वी व्यापार परिषदेत अमेरिकेने भारताला पूरक मुद‌्द्यांवर भर देत प्रतिसाद दिला.
लाेकशाहीवर भर
>शक्ती : एका सशक्त लाेकशाहीने दुसऱ्या लाेकशाही देशाला बळ मिळते.
>व्यापार : अमेरिका-भारत व्यापारात नैसर्गिक पार्टनर आहेत. समृद्ध भारत घडण्यात अमेरिकेचेही िहत.
>योग : अमेरिकेत योगासने करणारे ३ कोटी लोक आहेत. परंतु आम्ही कधी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणून दावा केला नाही.
>तज्ज्ञ : अमेरिकेत नामांकित सीईओ, अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, डॉक्टर, एवढेच नव्हे स्पेलिंग बी चॅम्पियन्स भारतीयच. याचा आम्हाला अभिमान.
>गांधीजी : महात्मा गांधींच्या अहिंसेनेच मार्टिन ल्यूथर किंग यांना प्रेरणा दिली.
>प्रतिसाद : ४६ मिनिटांच्या भाषणात सदस्यांनी ९ वेळा उभे राहत टाळ्यांचा कडकडाट केला. माेदींनीही अप्रत्यक्षपणे भारताची शक्ती दाखवून दिली.
बातम्या आणखी आहेत...