आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजानच्या पहिल्या दिवशी पूर्व अफगाणमध्‍ये दहशतवादी हल्ला; 54 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
खोस्ट - पवित्र रमजानच्या पहिल्याच दिवशी तालिबानच्या आत्मघाती हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू झाला. सुरक्षा दल तालिबान यांच्यातील धुमश्चक्रीत ३६ जण ठार झाले. मृतांमध्ये २२ दहशतवाद्यांचाही समावेश आहे. ही घटना पूर्वेकडील अफगाण शहरात घडली. खोस्ट भागात अमेरिकेच्या सहकार्याने काम करणाऱ्या अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलास या हल्ल्यातून लक्ष्य करण्यात आले.
 
आत्मघातकी कारद्वारे हा स्फोट घडवण्यात आला. सहा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी दिली. तालिबानी दहशतवाद्यांनी लष्कराबरोबर सार्वजनिक बस स्थानकाला उडवून दिले.
 
त्यात सैनिकांसह सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला. हा हल्ला सकाळी झाला. कंदहार तळावर शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात किमान १५ अफगाण सैनिकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा आत्मघातकी हल्ला झाला. एकाच आठवड्यातील हा तिसरा हल्ला आहे. पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या लष्कराला तालिबान संघटना लक्ष्य करते.
बातम्या आणखी आहेत...