आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत मशिदीवर हल्ला, १५ ठार;नमाज सुरू असताना हल्लेखोराने घडवला बॉम्बस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध- सौदी अरेबियात सुरक्षारक्षकांसाठीच्या मशिदीवर गुरुवारी अतिरेकी हल्ला झाला. यात १५ जणांचा मृत्यू, तर ९ जण जखमी झाले आहेत.

आत्मघातकी हल्लेखोराने दुपारच्या नमाजदरम्यान मशिदीत येऊन स्वत:ला स्फोटकांनी उडवले. सौदीच्या सुरक्षा दलावरील हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही मशिद दक्षिणेकडील असीर प्रांताची राजधानी अभा शहरात आहे. ती अभाची सुरक्षा करणाऱ्या स्पेशन वेपन्स अँड टॅक्टिक्सच्या (स्वात) जवानांसाठी वापरली जाते.
मृतांत स्वातचे १२ जवान, तर कपांउडमधील इतर तीन कामगारांचा समावेश आहे. स्फाेट घडवल्यानंतर हल्लेखोराच्या चिंधड्या उडाल्या. त्या मशिदी जागोजागी विखुरल्या होत्या.
आयएसवर संशय
कुणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मेमध्ये सौदीच्या २ शिया मशिदींत झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट संघटनेने घेतली होती. यात ४८ जण ठार झाले होते. शेजारी असलेल्या येमनमध्ये शिया बंडखोरांविरुद्ध अरब देशांच्या आघाडीच्या हवाई हल्ल्यांचे नेतृत्व सौदी अरेबिया करत आहे.
बातम्या आणखी आहेत...