आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack In Syria, Challenges Before Asad

सिरियात दहशतवाद्यांचा हल्ला, असदना आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत - वायव्य सिरियामध्ये सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणा-या क‍िनारपट्टीवरील भागात बंडखोरांनी मंगळवारी मोठा हल्ला चढवला. राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्त्वाचा होता. या भागावर असद यांच्या निष्ठावंत गटाचे वर्चस्व होते.
सिरियाच्या लष्करानेही बंडखोरांचा हा हल्ला भीषण असल्याचे म्हटले आहे. सहल अल-घाब या भागामध्ये घुसण्यासाठी बंडखोरांचे प्रयत्न असून असद यांच्या अलवाईट पंथाच्या नागरिकांची प्रचंड लोकसंख्या असलेला हा भाग आहे. या भागामधील एका वीजप्रकल्पासह एकूण १६ महत्त्वाची ठिकाणे बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. बंडखोरांच्या वतीने लढणा-यांमध्ये अल-कायदा या अत्यंत क्रूर समजल्या जाणा-या दहशतवादी संघटनेशी संलग्न अल-नुस्रा फ्रंटचे दहशतवादीही आहेत.

या भागावर बंडखोरांचे वर्चस्व कायम राहिले, तर आगामी काळात असद यांची अडचण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर हा हल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सिरियामध्ये अल-कायदापाठोपाठ आयएसअायएस या दहशतवादी संघटनेचे जाळे पसरत चालले अाहे. या देशाच्या अनेक भागांत आयएसआयएसने वर्चस्व प्रस्थापित केले असून या गटाविरुद्ध लढताना सिरियाच्या लष्कराची दमछाक होत आहे.