आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानचा ट्रक ठाण्यावर धडकला, ६ जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- तालिबानी दहशतवादी संघटनेने गुरुवारी पोलिस ठाण्यावर स्फोटकांनी भरलेला ट्रक धडकवला. त्यात किमान सहा जण ठार झाले. लोगार प्रांतातील पुल-ए-आलम शहरात ही घटना घडली. आम्ही स्फोटाचा मोठा आवाज ऐकला आहे. स्फोटामुळे सरकारी इमारतींचे नुकसान झाले आहे. हल्ल्याची जबाबदारी तालिबानी संघटनेने घेतली आहे. १०० सुरक्षा जवानांचा त्यात खात्मा झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबानचा नवीन म्होरक्या म्हणून मुल्ला अख्तर मन्सूरकडे सूत्रे गेल्यानंतर हिंसाचाराची ही मोठी घटना आहे. तालिबान आणि अफगाण सरकार यांच्यातील शांतता चर्चेला मोठा धक्का बसल्याचे मानते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आयएस संबंधीचे वृत्त