आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तासांत तीन घातपाती हल्ले, पर्यटकांसह ५२ ठार, १२ जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्युनिस - फ्रान्स, ट्युनिशिया आणि कुवैत या तीन राष्ट्रांमध्ये काही तासांच्या फरकातच तीन दहशतवादी हल्ले करण्यात आले. यात ५२ लोकांचे प्राण गेले असून त्यात अनेक पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शंका आहे. ट्युनिशियाच्या सीमावर्ती शहर साऊसेमध्ये शुक्रवारी एका रिसॅार्टमध्ये झालेल्या गोळीबारात २७ लोकांचा मृत्यू झाला. त्यात बहुतांशी ब्रिटन जर्मनीतील पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत.

ट्युनिशयाच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद अली अरो यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की मरहबा हॉटेलमध्ये घुसलेल्या एका बंदुकधारी दहशतवाद्याने गाळीबार सुरू केला. त्याला मारण्यात आले. त्याचा आणखी एक साथीदार लपून बसला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यामागे आयएसचा (इस्लामिक स्टेट) हात असल्याचा संशय आहे. पर्यटक नेमके कोणत्या देशांचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, हल्ल्यानंतर फ्रान्सच्या दुतावासाने एसएमएसच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मार्च महिन्यात ट्यूनिसमध्ये बार्डो नॅशनल म्यूझियमवर झालेल्या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला. यात एक स्थानिक पोलिस कर्मचारी वगळता अन्य सर्व परदेशी पर्यटक होते. त्यानंतर साऊसेमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता.

दहशतवाद्याचा सलाफी चळवळीशी संबंध
दरम्यानकुवैतमधील या हल्ल्यात ३५ वर्षीय दहशतवाद्याचे येसिन साल्ही याचा समावेश होता. आतापर्यंतच्या कारवायांमध्ये त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आलेली नाही. मात्र, कट्टर सुन्नी सलाफी चळवळीशी त्याचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. त्याला पत्नीसह अटक झाली असून अन्य एका संशयिताचीही चौकशी सुरू आहे.

आयएसने मुंडके कापून फॅक्टरीवर लटकवले
पॅरिसफ्रान्समध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. फ्रान्सच्या पूर्व भागातील सेंट क्वेंटिन फॅलेव्हियरमध्ये अमेरिकेच्या एअर प्रॉडक्ट फॅक्टरीमध्ये आयएसचा एक संशयीत स्फोटकांसह घुसला आणि एका व्यक्तीचे मुंडके कापून ते दरवाज्यावर लटकवले. शिवाय, मुंडक्यावर अरबी भाषेत संदेशही लिहिला असून त्याच्या बाजूला अरबचा ध्वजही सापडला आहे. या संदेशाचा अनुवाद केले जात आहे. दरम्यान, त्या व्यक्तीची त्याने दुसरीकडे हत्या करून या ठिकाणी आणले आहे की नाही, हे स्पष्ट झाले नाही. या स्फोटात आणखी काही लोकही जखमी झाले. राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे.

मशिदीत स्फोट, २५ ठार
कुवैतच्याएका शिया मशिदीत रमजानच्या नमाजादरम्यान शुक्रवारी एक आत्मघाती हल्ला करण्यात आला. यात २५ लोकांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर परिसरात रक्तमासांचा चिखल दिसत होता. अल सवाबेरमधील अल इमाम अल सादिक असे या मशिदीचे नाव आहे. ईस्लामिक स्टेटने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कुवैतमध्ये प्रथमच शिया मशिदीवर आयएसने हल्ला चढवला. २००६ नंतर आखाती देशातील हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे.