आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करा; पेंटागॉनने पाकला सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे. त्यामुळे उभय देशांतील संबंधात तणाव आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या िवरोधात प्रभावी पावले उचलत नाही. त्याचा परिणाम उभय देशांच्या संरक्षण सहकार्यावर होत आहे. म्हणूनच संबंध टिकवण्यासाठी आधी दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करा, असे पेंटागॉनने स्पष्ट केले.

पेंटागॉन अमेरिकेचा संरक्षण विभाग अाहे. पाकिस्तानला दिली जाणारी सर्व आर्थिक मदत पेंटागॉनने रोखली आहे. पेंटागॉनने अफगाणिस्तानवर काँग्रेसला (अमेरिकेची संसद) पाठवलेल्या सहामाही अहवालात अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. सुरक्षेसाठी पाकिस्तानला चांगले निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करावे लागणार आहेत, असे पेंटागॉनने म्हटले आहे. अफगाणिस्तानातील स्थैर्याबद्दल पाकिस्तानसोबतच्या अमेरिकेच्या चर्चेवरही त्याचा परिणाम होत आहे. त्याशिवाय सुरक्षा सहकार्यासारख्या इतर मुद्द्यांवरील चर्चेतही अमेरिका-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधात तणाव आला आहे. पेंटागॉनने १०० पानांचा अहवाल तयार केला आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातील कुनार प्रांतातील १६० मैल लांबीच्या सीमेवरील परिस्थिती बिघडली आहे. अफगाण राष्ट्रीय सुरक्षा दलावर या भागात पाकिस्तानकडून हल्ले सुरू झाले आहेत. संघर्षादरम्यान तोरखाम सरहद्द सहा दिवसांच्या तणावानंतर शनिवारी सुरू झाली आहे.

मदत थांबवण्यासाठी दिल्या अनेक सबबी
माझे चालले असते तर पाकिस्तानची सगळी मदत राेखली असती. पाकिस्तानने आेसामा बिन लादेनला लपवले. त्यामुळे तेथे घुसून त्यास ठार करावे लागले. सीआयएच्या प्रमुखाला पाकिस्तानात विष पाजून मारण्याचा प्रयत्न झाला. अमेरिकेचा पैसा अतिरेक्यांकडे जातो, असे खासदार टेंड पो यांनी सांगितले.

अतिरेक्यांच्या या अड्ड्यांना आश्रय
पेंटागॉनच्या अहवालानुसार पाकिस्तानात तालिबान, अल कायदा, अल कायदा भारतीय उपखंड, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, इस्लामी स्टे (खोरासान), इस्लामी मूव्हमेंट आॅफ उझ्बेकिस्तान.