आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Turf War: Taliban Warns Islamic State To Stay Out Of Afghanistan

संघर्ष विकोपाला, अफगाणपासून दूर राहाण्याचा तालिबानींचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- सिरिया, लेबनॉन व इराकमध्ये धुमाकूळ घालून आता अफगाणिस्तानकडे वळलेल्या इस्लामिक स्टेट (आयएस) या अत्यंत क्रूर दहशतवादी संघटनेला मूळ अफगाणमध्ये बस्तान असलेल्या तालिबानी अतिरेक्यांनी या देशापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

इस्लामिक अमिरातला (तालिबान) समाविष्ट करून नव्या समांतर संघटनेच्या स्थापनेची सध्या गरज नसल्याचेही बजावले आहे. या दोन्ही संघटनांच्या अितरेक्यांत अफगाणिस्तानच्या काही भागांत जोरदार संघर्ष पेटला आहे. पाकिस्तानातील ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’नुसार तालिबान व आयएसच्या अितरेक्यांत जोरदार धूमश्चक्री सुरू झाल्यापासून तालिबानी संघटनेने प्रथमच थेट आयएसवर भाष्य केले.

आहे. आयएसचा प्रभाव वाढत चालल्यामुळे काही तालिबानी अितरेकी या संघटनेत सहभागी होतील व मूळ तालिबानी संघटना कमकुवत होईल, ही या संघटनेच्या नेत्यांना धास्ती आहे.
तालिबानच्या अफगाणिस्तानात कार्यरत केंद्रीय समितीचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या मुल्ला अख्तर मुहम्मद मन्सूर यांनी आयएसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला लिहिलेल्या पत्रात आयएसने अफगाणिस्तानबाहेरच कारवाया कराव्यात, असे म्हटले आहे.

संघर्ष पेटला
दरम्यान, तालिबान व आयएसच्या अितरेक्यांत अफगाणच्या बाटिकोट भागात जोरदार संघर्ष सुरू असून या भागातील शेकडो कुटुंबे जलालाबादकडे स्थलांतरित होत आहेत. रविवारी पेशावरमध्ये झालेल्या हाश्मी हत्याकांडात आयएसचाच हात असावा, असा काही तालिबानी नेत्यांना संशय असून यामुळे आयएस-तालिबान संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होईल.

जिहाद चालूच राहील
>आयएसच्या कारवाया किंवा धोरणांत हस्तक्षेप करण्याचा तालिबानी संघटनांचाही हेतू नाही. हेच तत्त्व आयएसनेही पाळावे. इस्लाम आणि मुस्लिमांच्या हितासाठी हे गरजेचे अाहे.
- मुल्ला अख्तर मुहंमद मन्सूर, तालिबानी नेता