आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलऐवजी अतिरेकी करत आहेत मेसेंजर अॅपचा वापर, बनावट सिमकार्डचा धंदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद  - पकडले जाण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानमधील इस्लामिक स्टेटचे दहशतवादी एकमेकांशी थेट संपर्क साधण्याऐवजी मेसेंजर अॅपचा वापर करून प्रशासनाला हुलकावणी देत आहेत, असे वृत्त माध्यमांनी शुक्रवारी दिले आहे.  

‘द  एक्स्प्रेस ट्रिब्युन’च्या हवाल्याने एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आपला पत्ता लागू नये म्हणून इस्लामिक स्टेटचे दहशतवादी मोबाइल फोनसारख्या पारंपरिक दळणवळण माध्यमांचा वापर करण्याऐवजी टेलिग्राम मेसेंजर अॅपचा वापर करत आहेत. आतापर्यंत तरी त्यांची ही व्यूहरचना यशस्वी ठरली आहे. परस्परांशी संपर्क साधण्यासाठी दहशतवाद्यांना मेसेंजर अॅप हे अॅप्लिकेशन फायदेशीर ठरले आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते ‘सेल्फ डिस्ट्रक्टिबल’ आहे. टेलिग्राम अॅपद्वारे व्हाॅइस मेसेज पाठवला की बॅकअप नसल्याने तो फोनमधून आपोआप डिलिट होतो. त्यामुळे त्याला अटकाव करणे हे पोलिस आणि गुप्तचर संस्था यांच्यासाठी सध्यातरी अशक्य आहे. तोंडी संदेश देण्याव्यतिरिक्त संपर्कासाठी हे अॅप एकमेव साधन होते. त्यात मेसेंजर (लोक) इतर सदस्यांशी संपर्क साधतात.’  पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांत इस्लामिक स्टेटचा हात आहे, पण या संघटनेचे देशात संघटित अस्तित्व नाही, अशीच भूमिका प्रशासनाने वारंवार घेतली आहे.  
 
अटकावासाठी पोलिस, सुरक्षा दलांकडे तंत्रज्ञानाचा अभाव :  
या अॅपला अटकाव करणारे तंत्रज्ञानच सध्या पोलिस आणि सुरक्षा दलांकडे नाही, असे सांगताना हा अधिकारी म्हणाला की, आता काळ बदलला असून नवे तंत्रज्ञान आल्याने संपूर्ण परिस्थितीच बदलली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानाची भीती वाटते तशी ती दहशतवाद्यांना वाटत नाही. त्यामुळे ते ‘गेम चेंजर’ ठरले आहेत.  
 
बनावट सिमकार्डचा धंदा
पाकिस्तानमधील प्रशासनाने बनावट व्यक्तींच्या नावे सिमकार्ड देणे थांबवल्यामुळे दहशतवाद्यांना मोबाइल फोनचा वापर थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता. सरकारने २०१४ मध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी आघाडी उघडल्याने हजारो सिमकार्ड ब्लॉक झाले आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘प्रचंड नफा मिळत असल्याने अजूनही काही दुकानदार प्री-अॅक्टिव्हेटेड सिम विकत आहेत. ते निष्पाप लोकांना फसवून त्यांच्या बोटाचे ठसे तसेच सीएनआयसी क्रमांक घेतात आणि नंतर ते गुन्हेगारांना विकतात. हे सिमकार्ड दहशतवादीही वापरतात.’
बातम्या आणखी आहेत...