आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांनी हिंदू आश्रमातील सेवेकऱ्याची केली निर्घृण हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशात हिंदू पुजाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच शुक्रवारी संशयित दहशतवाद्यांनी एका आश्रमातील सेवेकऱ्याची हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे मुस्लिमबहुल देशात अल्पसंख्याक असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
नित्यरंजन पांडे (६०) असे हल्ल्यातील मृताचे नाव आहे. राजशाही शहरातील ठाकूर अनुकूल चंद्र सत्संग परमतीर्थ हेमायेतपूरधाम आश्रमात ही घटना घडली.
गेल्या चाळीस वर्षांपासून पांडे आश्रमाच्या सेवेत होते. शुक्रवारी मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर काही अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर आघात करण्यात आला. गळ्यावर धारदार शस्त्र चालवण्यात आले. हल्ल्यानंतर पांडे जागीच मृत्युमुखी पडले व हल्लेखोर पसार झाले. पाबना शहरातील ही घटना आश्रमापासून हाकेच्या अंतरावर घडली, अशी माहिती पोलिस अधीक्षक अलमगीर कबीर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात येत आहे. अगदी त्याच पद्धतीने ही हत्या झाली आहे. त्याच गटाने हा हल्ला केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आश्रमातील सर्वात समर्पण भावाने कार्य करणारे स्वयंसेवक म्हणून पांडे यांची आेळख होती. त्यांचा स्वभाव पाहता त्यांचे कोणाशीही वैर नव्हते. गेल्या तीन दशकांपासून आम्ही त्यांना आेळखत होतो, अशी आठवण आश्रमाच्या संचालकाने सांगितली. दरम्यान, भारतीय उच्चायुक्त संदीप मित्रा यांनी आश्रमाला भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...