आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेल्फी ड्रायव्हिंग कारच्या अपघातात पहिल्या व्यक्तीचा मृत्यू, सेन्सर बंद पडले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या अपघातात ओहिओत राहणा-या 40 वर्षांच्या जोशुआ ब्राऊनचा मृत्यू झाला. - Divya Marathi
या अपघातात ओहिओत राहणा-या 40 वर्षांच्या जोशुआ ब्राऊनचा मृत्यू झाला.
न्यूयॉर्क - सेल्फी ड्रायव्हिंग कारमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची जगातील पहिली घटना समोर आली आहे. अपघात 7 मे रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात झाला होता. यात ओहिओत राहणा-या 40 वर्षांच्या जोशुआ ब्राऊनचा मृत्यू झाला. ते ऑटो पायलट मोडवर चालणा-या टेस्लाच्या कारमधे बसले होते. ही कार ट्रेलरला जाऊन धडकली. मात्र टेस्ला मोटर्सने अपघातात आपली चुक झाल्याचे अमान्य केले आहे. कारचे सेन्सर सिस्टिम झाले होते खराब...
- टेस्ला मोटर्सने एक ब्लॉग पोस्टमध्‍ये सांगितले, की मॉडल या कारच्या सेन्सर सिस्टिमने काम करण्‍याचे बंद केले होते.
- यामुळे ऑटो पायलटवर चालणारी कारचा वेग वाढला होता. ती दुसरीकडे महामार्गावर जात असलेल्या 18 चाकांच्या ट्रेलर खाली घुसली.
- या घटनेत टॅम्पाचा (फ्लोरिडा) राहणारा ट्रक ड्रायव्हर फ्रँक बरसीही (62) जखमी झाला होता.
- अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफीक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने(एनएचटीएसए) आता हे प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
- सुरुवातीच्या अहवालात ट्रेलर अचानक डावीकडे वळण घेतल्याने हा अपघात घडला.
- कार इतके वेगवान होते की ते धडकल्यानंतर ट्रेलरच्या खालून निघून विजेच्या खांबाला टक्कर दिली. ब्राऊनचा जागेवरच मृत्यू झाला.
टेस्लाने चुक मान्य करायला दिला नकार
- टेस्ला मोटर्सच्या प्रसिध्‍दी दिलेल्या पत्रकानुसार, कंपनीने कोणतीही चुक केलेली नाही. ऑटो पायलट ड्रायव्हिंगमध्‍ये हा पहिली मृत्यूची घटना घडली आहे. कारच्या सॉफ्टवेअरला स्टेअरिंगवर हात ठेवण्‍याची सूचना देतो. यामुळे तो लक्ष केंद्रीत करु शकतो.
पहिल्या अपघातत 3 लोक झाले होते जखमी
- गुगलच्या सेल्फी ड्रायव्हिंग कारच्या अपघातात पहिल्यांदा तीन लोक जखमी झाल्याचे वृत्त होते.
- जुलै 2015 मध्‍ये गुगलने अपघाताबाबत खुलासा करताना सांगितले, की त्या कारमध्‍ये बसलेले तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.
- चाचणीच्या वेळी झालेल्या या अपघातात मागून येत असलेल्या कारने गुगलच्या कारला टक्कर मारली होती.
- गुगलच्या या प्रकल्पाचे प्रमुख ख्रिस अर्मसनने अपघातात गुगल कारची चुक मान्य करण्‍यास नकार दिला होता.
- ख्रिस म्हणाला होता, की 20 लाख मैलच्या चाचणीत 6 वर्षांत 14 अपघात झाले. मात्र एकही गुगल कारची चुक स्वीकारले गेले नाही.