आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: टेक्सासमध्ये अश्वेत तरुणीला पोलिसांनी दिली जनावरांप्रमाणे वागणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डलास- काही अश्वेत तरुण-तरुणींची पूल पार्टी सुरु होती. यावेळी पोलिसांच्या पथकाने छापा मारला. काही तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने एका अश्वेत मुलीला फारच वाईट वागणूक दिली. अगदी जनावराप्रमाणे तिला पकडले. तसेच काही अश्वेत तरुणांवर बंदुक रोखली. यामुळे अमेरिकी पोलिसांची आरोपींना पकडण्याची अमानविय पद्धत पुन्हा चर्चेत आली आहे. या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव एरिक कॅसबोल्ट आहे. त्याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मोठा गोंधळ उडाला.
मॅक्किनी शहरातील क्रॅग रॅंच नॉर्थ कम्युनिटी सेंटरमध्ये पूल पार्टी आयोजित करण्यात आली आहे. त्यात काही अल्पवयीन मुले आहेत. त्यांच्यात कडाक्याचे भांडण सुरु आहे. इतरांना ते त्रास देत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस पथक येथे दाखल झाल्यावर अनेक तरुण-तरुणी वाट मिळेल तिकडे पळू लागले. यावेळी एका पोलिस कर्चमाऱ्याने 14 वर्षीय मुलीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती आणि तिचे सहकारी विरोध करु लागले. तरीही त्या कर्मचाऱ्याने तिला जमिनीवर पाडले. आणि हातकडी घातली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महापौरांनी दिले चौकशीचे आदेश
मॅक्किनी शहराचे महापौर ब्रायन लॉमिलर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेने मला दुःख झाले असून पोलिसांच्या कृत्याबद्दल माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, पोलिस कर्मचाऱ्याने या तरुणीला कसे जमिनीवर पाडले... अगदी जनावराप्रमाणे दिली वागणूक... बघा व्हिडिओ... आणि फोटोही....
बातम्या आणखी आहेत...