आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्सासच्या बंदूकधा-याचा 'इसिस' संघटनेशी संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टन - टेक्सासमध्ये वादग्रस्त कार्टून प्रदर्शन स्थळाबाहेर पोलिसांवर गोळीबार करणा-या दोघांपैकी एका बंदूकधा-याचा आयएसआयएस संघटनेशी संबंध होता, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत संबंधित दहशतवादी मारला गेला. ३० वर्षीय इल्टन सिम्सन असे या अतिरेक्याचे नाव आहे. त्याने हल्ल्याच्या काही वेळापूर्वी आयएसआयएसशी संबंध असल्याचे टि्वट पोस्ट केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सिम्सन राहत असलेल्या फिनिक्स, अॅरिझॉन भागातील घराची एफबीआय चौकशी करत असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
२०११ मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीची माहिती पसरविल्याबद्दल त्याला दोषी धरण्यात आले होते. त्याआधी दहशतवादी कारवायांतील संशयास्पद सहभागाबद्दल त्याची चौकशी झाली होती. दोन बंदूकधा-यांची नावे नादिर सुफी आणि सिम्सन असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले होते.

सोमालियातील जिहादी गटात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या आरोपावरून सिम्सनवर २००६ पासून प्रशासनाने त्याच्यावर पाळत ठेवली होती. न्यायालयाने २०१० मध्ये त्याला या प्रकरणात दोषी ठरवले होते. कार्टून प्रदर्शन बंद होण्यापूर्वी दोघा बंदूकधा-यांनी नि:शस्त्र गारलँड आयएसडी सुरक्षा अधिका-यावर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखलच्या गोळीबारात दोघे दहशतवादी ठार झाले.