आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TF X New Flying Car Concept Can Fit In A Normal Garage Revealed

विमानाच्या वेगाने उडेल ही कार, ताशी 805 किमी वेगाने करेल प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेराफुगिया कंपनीची उडणारी कार, टी एफ एक्सचे डिझाइन. - Divya Marathi
टेराफुगिया कंपनीची उडणारी कार, टी एफ एक्सचे डिझाइन.
इंटरनेशनल डेस्क - आता वाहतुकीच्या समस्येवर तोडगा म्हणून रस्त्यावर धावणाऱ्या कारबरोबरच हवेत उडणाऱ्या कारही लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत. मेसाच्युसेट्सच्या टेराफुगिया कंपनीने हवेड उडणाऱ्या कारचे नवे डिझाईन सादर केले आहे. कंपनीने त्याला टीएफ-एक्स असे नाव दिले आहे. त्यात चार लोक बसू शकतात. ही कार तुम्ही घराच्या गॅरेजमध्येही सहज पार्क करू शकता. कंपनीने एका व्हिडिओमध्ये अॅनिमेशनद्वारे या कारबाबत माहिती दिली आहे.

वैशिष्ट्ये
या कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर असलेले पंख असतील. हवे तेव्हा ते फोल्ड होऊ शकतील. कंपनीच्या मते रस्त्यावर ही कार ताशी 322 किमी वेगाने धावेल. तर हवेत या कारचा वेग ताशी 805 किमी असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कारच्या मदतीने डोअर टू डोअर वाहतूकही शक्य आहे. ही सेमिऑटोनॉमस कार आहे. तिचे कंट्रोलिंग कॉम्प्युटरद्वारे होईल. त्यामुळे प्रवाशाला ज्याठिकाणी जायचे असेल त्याठिकाणचे नाव टाकून टेकऑफ करता येईल.

8-12 वर्ष लागणार
कंपनीच्या मते ही कार तयार करण्यासाठी 8 ते 12 वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारची अंदाजे किंमत 183000 पाउंड (1 कोटी 8 लाख रुपये) असल्याचे सांगितले जात आहे. हे रोड-लीगल एअरप्लेन चालवणाऱ्याला पायलट आणि ड्रायव्हर दोन्हीचे परवाने गरजेचे असतील. कंपनीने यापूर्वी याचवर्षी ट्रांसिशन नावाची फ्लाइंग कार सादर केली होती. त्या कारची आसनक्षमता दोन व्यक्तींची होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, टेराफुगिया कंपनीच्या उडणाऱ्या कारचे PHOTOS