आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thailand Constitution: Military's Council Rejects Draft

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडमध्ये नवीन राज्यघटना नामंजूर; तूर्त लष्करी सरकार कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडच्या लष्करी राजवटीच्या परिषदेने देशाच्या नवीन वादग्रस्त राज्यघटनेला फेटाळून लावले आहे. गेल्या वर्षी लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीने नऊ महिन्यांत त्याचा नवा मसुदा तयार केला होता.

आता नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीला १८० दिवसांत राज्यघटनेचा नवा मसुदा तयार करावा लागणार आहे. त्यावर देशव्यापी जनमताचा कौल घेतला जाणार आहे. त्याचा परिणाम म्हणजे निवडणूक पुढे ढकलावी लागणार आहे. तोपर्यंत सत्ता लष्कराकडेच राहणार आहे. राष्ट्रीय सुधारणा परिषदेची रविवारी बैठक झाली. त्यात एकूण २४७ पैकी १३५ सदस्यांनी राज्यघटनेच्या नव्या मसुद्याला फेटाळून लावले. केवळ १०५ सदस्यांनी मसुद्याच्या बाजूने मतदान केले. सात सदस्य अनुपस्थित होते. निवडणूक किंवा राष्ट्रीय संकटाच्या काळात २३ सदस्यांच्या समितीने देशाची सूत्रे हाती घेणे, हा मसुद्यातील सर्वात वादग्रस्त मुद्दा ठरला. लष्करी राजवटीमुळे देशातील लोकशाही मूल्यांचा संकोच झाला आहे. त्यामुळे लोकशाहीवाद्यांची गळचेपी होत आहे. हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार चालवण्यात येत असल्याने निवडणुकीचे वेध नागरिकांना लागले आहेत. त्यानंतर बदल शक्य आहे.
मंजुरी मिळू नये, हीच लष्कराची इच्छा
पंतप्रधान प्रयुथ यांनी स्थापन केलेल्या आर्थिक टीमला देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी आणखी अवधी द्यावा, असा आमचा हेतू असल्याचे परिषदेच्या सदस्यांनी सांगितले. काही अन्य सदस्यांचे मते राज्यघटनेला मंजुरी दिली गेल्यास राजकीय परिस्थिती बिघडू शकते. राज्यघटनेच्या नवीन मसुद्याला मंजुरी मिळावी, असे राजकीय विश्लेषकांना वाटत नाही. लष्कराने अंतिम टप्प्यात त्यात आणखी एका मुद्द्याची तरतूद केली. त्यानुसार लष्कराची बहुमत असलेली परिषद कायद्याने पाच वर्षांपर्यंत सत्ता हाती ठेवू शकते.