आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजे भूमिबोल यांच्या निधनाने थायलंड शोकसागरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडचे राजे भूमिबोल अतुल्यतेज यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. जगात सर्वात प्रदीर्घ म्हणजे तब्बल सात दशकांची त्यांची कारकीर्द होती. देशाच्या एकात्मतेचे प्रतीक अशी त्यांची ओळख होती.
सिरिराज रुग्णालयात स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.५२ वाजता त्यांचे निधन झाले. यावेळी युवराज महा वजिरालोंगकोर्न तसेच राजघराण्यातील इतर सदस्य उपस्थित होते. रुग्णालयाबाहेर दोन दिवसांपासून नागरिकांनीही गर्दी केली होती. राजे भूमिबोल यांच्या निधनाचे वृत्त एेकताच या नागरिकांमध्ये तसेच संपूर्ण देशात शोककळा पसरली. अनेक लोक हातात त्यांचे छायाचित्र घेऊन अश्रू ढाळत होते. आता ६३ वर्षीय युवराज महा वजिरालोंगकोर्न हे देशाचे नवे राजे असतील, अशी घोषणा थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी दूरचित्रवाणी वाहिनीवरून केली. राजे भूमिबोल हे चक्री घराण्याचे नववे राजे होते. त्यामुळे त्यांना नववा राम असेही संबोधले जात होते. भावाच्या निधनानंतर १९४६ मध्ये ते सत्तेत आले. तेव्हापासून तब्बल सात दशके ते राजगादीवर होते. अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती बिघडत होती.
बातम्या आणखी आहेत...