आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Are 13 Countries Where Atheism Is Punishable By Death

पाकिस्‍तानसह या 13 देशांत नास्तिक असणे म्‍हणजे गुन्‍हा, दिला जातो मृत्‍यूदंड; वाचा facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - जगातील बहुतांश देशात लोकशाही आहे. दरम्‍यान, ज्‍या देशात राजेशाही आहे तिथेही नागरिकांचे मूलभूत अधिकार जपले जातात. मात्र, जगात असे 13 देश आहेत की जिथे ईश्‍वराचे अस्‍तित्‍व मानने कायद्याने बंधनकारच आहे. जर कुणी असे करत नसेल तर तो गुन्‍हा ठरतो आणि अशा व्‍यक्‍तींना थेट मृत्‍यूदंड दिला जातो. या देशांबद्दल खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
कशी आली माहिती समोर
इंटरनॅशनल ह्यूमनिस्ट अॅण्‍ड एथिकल यूनियन दरवर्षी Freedom of Thought हा अहवाल सादर करते. यावर्षीच्‍या अहवालात ही धक्‍कादायक माहिती देण्‍यात आली आहे.
भारत, बांगलादेशाचाही समावेश
भारत आणि बांगलादेशात नास्तिक असणे गुन्‍हा नाही. परंतु, कुणी जर ईश्‍वर मानत असेल आणि नास्तिक व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या श्रद्धास्‍थानावर टीका करून भावना दुखावल्‍या तर तो गुन्‍हा ठरतो. त्‍यासाठी या दोन्‍ही देशात किरकोळ शिक्षा दिले जाते, याचाही उल्‍लेख या अहवाला आहे.
पाकिस्‍तान
पाकिस्‍तानात ईश्‍वराचे अस्‍ति‍त्‍व नाकारणे म्‍हणजे गुन्‍हा नाही. परंतु, कुणी जर ईश्‍वरावर अश्‍लील कॉमेंट, घृष्‍णास्‍पद टीका करत असेल तर तो गुन्‍हा आहे आणि हा गुन्‍हा सिद्ध झाला तर त्‍या व्‍यक्‍तीला मृत्‍यूदंड किंवा जन्‍मठेप दिली जाते.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, कोणत्‍या 12 देशांत नास्तिकांना दिला जातो मृत्‍यूदंड....