आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेश दौ-यापूर्वी अध्यक्षांच्या कार्यालयाची व्हियाग्रा खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - दक्षिण कोरियात विविध घोटाळे उघड होत असतानाच आता एक नवा अनोखा घोटाळा उजेडात आला आहे. अध्यक्षा पार्क गुन हे यांच्या आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या कार्यालयाने व्हियाग्राच्या ९६० गोळ्या खरेदी केल्या होत्या, असा आरोप होत आहे. सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या कार्यालयाने अशी खरेदी झाल्याचे मान्य केले.
अध्यक्षांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरणही आश्चर्यकारक आहे. कार्यालयाने म्हटले आहे की, पार्क गुन हे यांनी मे महिन्यात इथिओपिया, केनिया आणि युगांडाचा दौरा केला होता. या आफ्रिकी देशांची राजधानीची शहरे समुद्रसपाटीपासून १-२ किलोमीटरवर आहे. तेथे अध्यक्षांच्या स्टाफला ‘अल्टिट्यूड सिकनेस’चा धोका होता. त्यामुळे व्हियाग्राच्या गोळ्या खरेदी करण्यात आल्या होत्या. अध्यक्षांचे प्रवक्ता जुंग यून-कुक म्हणाले की, ‘त्यापैकी एकाही गोळीचा वापर करण्यात आला नाही.’

दक्षिण कोरियाचे डॉक्टर कधीकधी गिर्यारोहकांनाही व्हियाग्रासारख्या गोळ्या लिहून देतात. या गोळ्या समुद्रसपाटीपासून उंच गेल्यानंतर होणाऱ्या संभाव्य आजारांपासून वाचवतात, असे त्यांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा पार्क गुन हे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि विरोधकांनी त्यांच्या विरोधात संसदेत महाभियोग ठराव आणण्याची घोषणाही केली आहे.
बातम्या आणखी आहेत...