आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेचा राष्ट्रपती बदलला जाणे शक्य, तीन राज्यांमध्ये पुन्हा मतमोजणीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल बदलण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रीन पार्टीच्या उमेदवार जिल स्टेन यांनी बुधवारी मोहीम सुरू केली. त्यात मिशिगन, पेन्सिल्व्हानिया व व्हिस्काँसिन या रस्ट बेल्टच्या तीन राज्यांत फेरमतमोजणीची मागणी केली. या राज्यांत ४६ इलेक्टोरल मते आहेत. ती सर्व डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाली आहेत. येथील निकाल बदलल्यास ही सर्व ४६ मते हिलरी क्लिंटन यांच्याकडे जातील. त्यामुळे मोठी उलथापालथ होईल.

स्टेन यांनी सांगितले की, फेरमतमोजणी करण्यासाठी मला २० लाख डॉलर जमा करावे लागतील. त्यांनी शुक्रवारपर्यंत देणगीतून ही रक्कम जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. ते गुरुवारीच पूर्णही झाले. त्या म्हणाल्या की, मतदान यंत्रे हॅक करण्यात आली आहेत, असे गेल्या ४८ ते ७२ तासांपासून सायबर तज्ज्ञ म्हणत आहेत. स्टेन तसेच इतर लिबरल आता मतांचे ऑडिट आणि फेरमतमोजणीची मागणी करत आहेत.

विशेष म्हणजे जिल स्टेन अपक्ष म्हणून रिंगणात होत्या. या राज्यांत निकाल बदलल्यास त्यांच्या स्थितीत बदल होणार नाही. पण या राज्यांत स्टेन यांना जेवढी मते मिळाली आहेत ती जर हिलरी यांना मिळाली असती तर हिलरी जिंकल्या असत्या.

पुढे वाचा, निकाल फिरल्यास काय?
बातम्या आणखी आहेत...