आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Dying Aral Sea Most Shocking Environmental Disasters

PHOTOS: जगातील चौथ्‍या क्रमांकाचा समुद्र आटला, जहाजांना मिळेना रस्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: अरल समुद्रात उभे असलेले जहाज, कधी काळी हा भाग समुद्राच्या पाण्‍याने भरलेला होता.)
कझा‍किस्तान आणि उत्तर उझबेकिस्‍तानच्या दरम्यान असलेला अरल समुद्र आटला आहे. नुकतेच युरोपियन स्पेस एजेन्सीच्या रडार सॅटेलाइटमधून घेण्‍यात आलेल्या छायाचित्रांमध्‍ये सागराची सद्य:स्थिती स्पष्ट होते. जगातील चौथ्‍या क्रमांकाचा समुद्र म्हणजे अरल गेल्या 50 वर्षांमध्‍ये 90 टक्के कोरडा झाला आहे. एक अशीही वेळ होती जेव्हा 1 हजार 534 आयलँड्स असलेला समुद्र बेटांचे सागर म्हटले जात होते. ही जगातील सर्वात मोठी पर्यावरणीय संकट आहे.1997 मध्‍ये कोरडा होत चाललेला अरल सागर चार तलावात विभागला गेला होता. उत्तर अरल सागर, पूर्व भाग, पश्चिम भाग आणि सर्वात मोठ्या भागाला दक्षि अरल समुद्र अशी त्यांना नावे देण्‍यात आली होती.
2009 पर्यंत समुद्राचा आग्नेय भाग संपूर्ण कोरडा ठक झाला आणि नैर्ऋत्य भाग बारीक पट्टीत रुपांतर झाला आहे. नुकतेच संयुक्त राष्‍ट्राचे महासचिव बान की मूनने मध्‍य आशियाच्या नेत्यांबरोबर अराल समुद्राचा दौरा केला. पर्यावरणीय संकटाला तोंड देण्‍यासाठी मून यांनी उपस्थित नेत्यांना आवाहन केले.

समुद्र कोरडा पडण्‍याचा परिणाम
समुद्र आटल्याने सर्वात जास्त परिणाम येथील समृध्‍द मासेमारी व्यवसायावर झाला. मासेमारी व्यवसाय पूर्णपणे संपला. यामुळे बेरोजगारी आणि आर्थिक संकटांचा क्रम सुरु झाला. आटल्याने प्रदूषण वाढले आहे आणि अरल समुद्राच्या परिक्षेत्रात राहणा-या लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हवामानावरही याचा खूप परिणाम झाला आहे. उन्हाळा असो हिवाळा दोन्हींचा कहर सुरु झाला आहे.
का आटला समुद्र
अराल समुद्राच्या आटण्‍याची प्रक्रिया सोव्हिएत संघाच्या एका प्रकल्पाने झाला. 1960 मध्‍ये सोव्हिएत संघाच्या सिंचन प्रकल्पासाठी नद्यांचा प्रवाह बदलण्‍या आला होता. यानंतर हा समुद्र आटायला लागला. हे संकट दूर करण्‍यासाठी कझाकिस्तानने 2005 मध्‍ये एक धरण बांधले होते. याने 2008 मध्‍ये समुद्रातील पाण्‍याची पातळी वाढली. असे असूनही अराल समुद्राची स्थितीत बदल झाला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अरल समुद्राची बिकट स्थितीचे फोटोज...