आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान मोदी स्वत:ला अजुनही \'मुख्यमंत्री\'च समजतात- द इकोनॉमिस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंदन- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर चहु बाजुंनी टीकेची झोड उठली असताना ब्रिटिश मॅग्झिन 'द इकोनॉमिस्ट'ने मोदींवर टीका केली आहे. मोदी अजूनही स्वत:ला मुख्यमंत्रीच समजत आहे. परंतु, ते एका राज्याचे नव्हे तर राष्‍ट्राचे नेतृत्त्व करत असल्याचे 'वन मॅन बॅंड' (मोदी) या शीर्षकाखालील लेखात म्हटले आहे.

नरेंद्र मोदी एक विभाजनात्मक व्यक्तिमत्त्व असल्याचे या लेखात म्हटले आहे. लेखासोबत मोदींना अनेक म्युझिकल इंस्ट्रूमेंट्‍स वाजवताना दाखवण्यात आले आहे.

एक वर्षापूर्वी सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपने देशातील जनतेला 'अच्छे दिन आणे आले है' असे आश्वासन दिले होते. परंतु, मोदी सरकारची विकासाची गती फारच निराशाजनक असल्याचा टोला लगावला आहे. भारतात पहिल्यांदा तीस वर्षांच्या इतिहासात भाजपला स्पष्‍ट बहुमत मिळाले आहे. भाजपला देशात देशात परिवर्तन आणायचे आहे. परंतु 'वन मॅन बॅंड' अर्थात मोदींसमोर एक नव्हे तर अनेक कामे आहेत. आणि हीच सगळ्यात मोठी अडचण आहे.

'द इकोनॉमिस्ट' मते, मोदी देशाचे पंतप्रधान बनले आहे. परंतु मोदी अजुनही 'गुजरातचे मुख्यमंत्री' म्हणून विचार करत आहेत. मोदी एका राष्‍ट्राचे नेतृत्त्व करत आहे. त्यामुळे त्यांची संपूर्ण राष्ट्राला समृद्ध आणि बळकट बनवण्याची दृष्‍टी ठेवायला हवी. 'वन मॅन बॅंड'ला (मोदी) देशात एकट्याने परिवर्तन घडवून आणायचे असेल तर नवी 'ट्यून' शोधावी लागणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 'द इकोनॉमिस्ट'मधील लेख 'वन मॅन बॅंड'सह प्रसिद्ध झालेले नरेंद्र मोदींचे छायाचित्र...