आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूगर्भाच्या अतिखोलातही पाण्याचे अस्तित्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भूगर्भात ४०० ते ६०० किलोमीटर खोलात पाण्याचे अस्तित्व आहे. पूर्वी झालेल्या संशोधनांनुसार अति खोलात पाणी असण्याच्या तर्काला नाकारण्यात आले होते. खनिजांचेही अस्तित्व असेच खोलपर्यंत आहे. खनिजांचे अस्तित्व असणे म्हणजेच पाण्याच्या असण्याचे सूचक असल्याचे संशोधकांनी म्हटले.

ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापीठ व अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी संयुक्तरीत्या यावर संशोधन केले. भूगर्भात ४०० ते ६०० किलोमीटर खोलापर्यंत पाण्याचे साठवण पॉलिमॉर्फच्या उच्च दाबामुळे होते. तो साठाही खनिजांच्या अस्तित्वामुळे जतन केला जातो. ब्रुसाइट खनिजाच्या असण्याने पाणी साठवले जाते. ब्रुसाइटचे अस्तित्व असण्याला पूर्वी संशोधकांनी नाकारले होते. या खनिजाचा साठा भूगर्भात स्थिर स्वरूपात असल्याचा दावा नव्या संशोधनात प्रो. मैनाक मुखर्जी आणि अँड्रिस हरमन यांनी केला आहे.
पुढील संशोधनांची दिशा बदलणारा शोध
पूर्वी हायड्रस मिनरल्समुळे पाण्याचा साठा जतन होतो अशी कल्पना कोणीही केलेली नव्हती. यामुळे पाणी व खनिजद्रव्यांसंबधीच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली असल्याचे मुखर्जी म्हणाले. किती मोठा पाण्याचा साठा यात दडलाय या दिशेने आता पुढील संशोधन केले जाईल. अति उच्च दाबामुळे पाणी साठवले जाते व त्याचे जतन करणाऱ्या खनिजांच्या संशोधनालाही यामुळे चालना मिळाली.
खनिजांचे विघटन करणे गरजेचे : भूगर्भातील पाण्याचा साठा किती आहे हे समजण्यासाठी ब्रुसाइटसारख्या खनिजाचे विघटन करावे लागेल. त्यानंतर त्याद्वारे किती पाणी वेगळे केले जाऊ शकते याचे अनुमान काढता येईल. भूगर्भाच्या अतिखोलात अशा खनिजांचे अस्तित्व ज्या प्रमाणात आहे तितक्याच प्रमाणात पाण्याचा साठाही असेल असा निष्कर्ष तूर्तास स्थापित झाला आहे.

सद्य:स्थितीत पाणी हा विषय ऐरणीवर

पर्यावरणाच्या शाश्वततेविषयी अनेक संशोधने सुरू आहेत. त्यातही पाणी हा घटक अस्तित्वाची पूर्वअट असल्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या उपयोगितेविषयीदेखील मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. भूपृष्ठावरील पाण्याइतकेच महत्त्व भूगर्भातील पाण्यालाही येत आहे. भूगर्भात पाण्याचा किती मोठा साठा आहे हे शोधणेच आपल्या संशोधनाचा उद्देश असल्याचे मुखर्जी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...