आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The First Critical Mass Ride In Budapest Was Organised On Car Free Day Hungary

सायकलींना रस्ता द्या, १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी अशी केली मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये अनोखी निदर्शने झाली. येथील दहा हजारांपेक्षा जास्त नागरिक सायकलवरून मार्गारेट आयलँडला आले. त्यांनी इथे सायकल डोक्यावर उचलून निदर्शने केली. सरकारने इको फ्रेंडली वाहन सायकलसाठी स्वतंत्र रस्ता द्यावा, अशी त्यांची मागणी होती. रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीत रोज सायकल -वाहनचालकांमध्ये भांडणे होतात.
डच राजदूताची सायकल संस्कृती बनवण्याची मोहीम
डचचे राजदूत गजूस चेलटेमा यांच्या आवाहनानंतर हंगेरीत आंदोलक एकत्र आले होते. बुडापेस्टमध्ये सायकल संस्कृती विकसित करण्याची त्यांची इच्छा आहे. सायकलस्वारांसाठी रस्त्यात अडथळा नसावा, अशी त्यांची मागणी आहे.