आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाली जन्मलेल्या बाळांच्या संघर्षाला सन्मान,घरी पाठवताना घातली जाते ग्रॅज्युएशन डिग्री कॅप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्थ कॅरोलिना- अकाली जन्मलेल्या बाळांच्या जीवनातील नंतरचा काही काळ अत्यंत संघर्षाचा असतो. या मुलांना सन्मान मिळावा म्हणून अमेरिकेतील एक रुग्णालय अनोखा उपक्रम राबवते. रुग्णालयातून सुटी देताना या बाळांना ग्रॅज्युएशन डिग्री कॅप घातली जाते. यासाठी मोठा समारंभ होतो. मुलांसोबत पालकांचाही सत्कार केला जातो. सोबत रुग्णालय कर्मचारी नृत्य-गाण्यासह पार्टी करतात.

रुग्णालयानुसार, बाळांना डिग्री कॅप घालण्याचा उद्देश असा की, बाळाचे माता-पिता आनंदाने रुग्णालयातून घरी जावेत. त्यांचे भावी जीवन आनंदी व्हावे. अकाली जन्मलेल्या मुलांचे जीवन अत्यंत कष्टप्रद असते. जन्मताच त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. अनेकदा एक-दोन महिने या बाळांना तेथेच ठेवावे लागते. यामुळे त्यांच्या माता-पित्यांनाही खूप त्रास सहन करावा लागतो. नॉर्थ कॅरोलिनामधील गेस्टोनियात कॅरोमाँट रिजनल मेडिकल सेंटरने यामुळेच हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णालयातील परिचारिका मेलिसा जॉर्डन म्हणाल्या, “सहा महिन्यांपूर्वी आम्ही हा उपक्रम सुरू केला. येथे एक बाळ २९व्या आठवड्यात जन्मले होते. त्याला ६२ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्याला रुग्णालयातून घरी पाठवताना सहज विचार आला की बाळाच्या पालकांना पार्टी देऊन निरोप द्यावा. तेव्हापासून हा उपक्रम सुरू आहे.’

कॅपवर प्रेरणादायी संदेश
बाळांना घालण्यात आलेल्या कॅप फोमच्या असतात. विविध रंगांच्या या कॅपवर प्रेरणादायी संदेश लिहिलेले असतात. भूतकाळ विसरून भविष्याकडे वाटचाल, वाईट काळ विसरून नव्या उमेदीची कास असे या संदेशांचे अर्थ असतात.
बातम्या आणखी आहेत...