आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचे द इस्लामिक स्टेट रेडिआे स्टेशन सुरु, ‘अॅगनी अंकल’द्वारे शंकानिरसन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - द इस्लामिक स्टेट रेडिआे स्टेशनची सुरुवात नुकतीच करण्यात आली. यात ‘अॅगनी अंकल’ नावाचा फोन-इन कार्यक्रमही प्रक्षेपित केला जात आहे. या कार्यक्रमात जिहादी आणि त्यांच्या समर्थकांच्या व्यक्तिगत अडचणी सोडवण्यात येणार आहेत. अल-बयान नामक कार्यक्रमाची निर्मिती खास इराकी दहशतवाद्यांसाठी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात रेडिआेच्या माध्यमातून धर्मगुरूंचे ‘फतवे’ सांगितले जातात. याविषयीच्या शंकांचे निरसन धर्मगुरूंद्वारे करण्यात येते. इस्लामिक कायद्यासंदर्भातील खुलासेही यात केले जातात, असे मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सूत्रांनी सांगितले.

इसिसचे व्हिडिआे महिलांना दाखवावेत का?
अॅगनी अंकल फोन इन कार्यक्रमात एकाने प्रश्न विचारला की, इसिसने जारी केलेले व्हिडिआे महिलांना दाखवणे उचित आहे का? या व्हिडिआेमध्ये पराकोटीची हिंसा दाखवली जाते. मुस्लिम महिलांना ते न दाखवणे उचित, असे अनेक कट्टर मुस्लिमांचे मत आहे. विशेष म्हणजे एका उच्चशिक्षित मुस्लिमाने हा प्रश्न विचारला होता. महिलांमधील विनम्रता यामुळे नष्ट होते.

असे मिळाले उत्तर
इसिसच्या व्हिडिआेमध्ये परपुरुष असतात. परपुरुषाचे दर्शन महिलांसाठी वर्ज्य असल्याने हे व्हिडिआे महिलांना दाखवू नयेत. त्यामुळे त्यांच्या मनात मोह निर्माण होतात, असे उत्तर अॅगनी अंकलने दिले. दुसऱ्या इस्लामिक तज्ज्ञाने याचे उत्तर याविरुद्ध दिले. इस्लाममध्ये महिलांनी पुरुषांच्या दृष्टीस पडू नये असे लिहिले आहे. मात्र, पुरुषांनी महिलांच्या दृष्टीस पडू नये असे यात नाही.
बातम्या आणखी आहेत...