आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ पुरुषांसाठीचे बेट; जागतिक वारशात होणार समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानच्या एका बेटावर केवळ पुरूषांनाच जाण्याची परवानगी आहे. आता या बेटाचा समावेश जागतिक वारशात करण्याची  युनेस्कोने तयारी चालवली आहे. पुरूषवर्ग येथे फक्त धार्मिक कार्यासाठी जातात. कोणासही येथून गवताची काडी आणण्याचीही परवानगी नाही. अॅडव्हायझरी पॅनेलने ओकिनेशिमा बेटास जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. यावर येत्या  जुलै महिन्यात निर्णय होईल.  जपान टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या बेटावर एक मंदिर असून तेथे समुद्रदेवतेची पूजा होते. या पूजेबाबत किंवा याच्या धार्मिक विधीबाबत कोणास सांगण्यास मनाई आहे. 
बातम्या आणखी आहेत...