आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Itaipu Dam Is A Hydroelectric Dam On The Parana River Located On The Border

३२ वर्षांपूर्वी ब्राझील-पॅराग्वेच्या दोन हुकूमशहांनी बांधले धरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र जगातील सर्वात मोठ्या प्रमुख धरणापैकी एक असून हा धरण "इताइपू हायड्रो इलेक्ट्रिक प्लँट अँड डॅम'वर बांधण्यात आलेले आहे. ब्राझील आणि पॅराग्वेच्या सीमेवर असलेले हे धरण स्थापत्यशास्त्रातील सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. हे धरण पाहण्यासाठी हजारो अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरिक जगभरातून येत असतात. पराना नदीवर १९८४ मध्ये उभारण्यात आलेल्या या संयंत्रातील २२ टक्के वीज ब्राझील वापरते, तर ७८ टक्के विजेचा वापर पॅराग्वे करतो. येथे २० टर्बाइन बसवण्यात आले आहेत. प्रत्येकाची वीजनिर्मितीची क्षमता ७०० मेगावॅट इतकी असून १२ हजार ६०० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती येथे होते. हे जगातील सर्वात मोठे वीजनिर्मिती केंद्र आहे. या धरणाची उंची १९६ मीटर इतकी असून लांबी ७ हजार ९१९ मीटर आहे. धरणाच्या निर्मितीसाठी ऑक्टोबर १९७८ मध्ये पराना नदीचा प्रवाह बदलण्यात आला. यानंतर ऑक्टोबर १९८२ मध्ये जलसाठा करणारे क्षेत्र तयार झाले. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात मोठा पूर आल्याने एकदाच या धरणात १०० मीटर पाणी साठले होते. मे १९८४ मध्ये पहिल्या युनिटचे काम सुरू झाले.
- धरणाचे बांधकाम चालू असताना ऑक्टोबर १९७९ मध्ये याच्या जलसाठ्यावरून अर्जेंटिना, ब्राझील आणि पॅराग्वे यांच्यात करार झाले. ब्राझील या बंधाऱ्याचे पाणी सोडून अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्सला बुडवू शकतो, असा संशय अर्जेंटिनाला होता, त्यामुळेच त्यांनी करार केला. हे संयंत्र १० अणु संयंत्रापेक्षा जास्त विद्युत उत्पादन करते.