आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यमालेतील सर्वांत मोठा गुरूचा जुळा भाऊ सापडला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- आपल्या सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह म्हणून ओळख असलेल्या गुरू ग्रहासारखाच, तेवढ्याच वस्तुमानाचा एक ग्रह संशोधकांना सापडला असून या ग्रहाचे गुरूशी इतके साधर्म्य आहे की हा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरतो आहे त्यातील अंतर गुरू व सूर्यात असलेल्या अंतराइतकेच आहे. ‘एचआयपी ११९१५’ या ताऱ्याभोवती हा नवा गुरू फिरत अाहे. विशेष म्हणजे या ताऱ्याचे वय देखील आपल्या सूर्यमालेतील सूर्याइतकेच असल्याचे

प्रथमदर्शनी दिसत आहे.
पृथ्वी असलेल्या सूर्यमालिकेमध्ये गुरू ग्रहाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. या ग्रहामुळेच ही सूर्यमालिका अस्तित्वात आल्याचे संशोधकांचे मत आहे. आता आपल्या सूर्यमालेशी साधर्म्य असलेली आणखी एक सूर्यमाला अस्तित्वात असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसऱ्या पृथ्वीची शक्यता?
गुरूसारखाच एक ग्रह सापडल्याने आता याच प्रकारची दुसरी सूर्यमाला आिण यातील दुसऱ्या पृथ्वीचा शोध आता सुरू होईल. या नवीन ग्रहाच्या शोधामुळे शास्त्रज्ञांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून अशा सूर्यमालेत जीवसृष्टी असलेला एखादा ग्रह असू शकतो, असे शास्त्रज्ञांना वाटते.
असा लागला शोध
ग्रहताऱ्यांच्या शोधासाठी हाय रॅडिएल व्हेलॉसिटी प्लॅनेट सर्चर (एचएआरपीएस) हे आधुनिक प्रणालीने सज्ज असलेले उपकरण तयार करण्यात आले असून जगातील हे उपकरण अचूकतेबाबत सर्वांत विश्वासार्ह मानले जाते. यापूर्वीही गुरू ग्रहाशी साधर्म्य असलेले ग्रह सापडले आहेत. मात्र, या नव्या ग्रहाबद्दल जी माहिती मिळाली ती अगदी अचूक आहे.
नवीन सूर्यमालेस प्रतीक्षा
गुरूसारख्या या ग्रहाचा लागलेला शोध म्हणजे आणखी एक सूर्यमाला शोधाची वाट पाहत आहे, असेच म्हणावे लागेल. संशोधकांतही याबाबत उत्सुकता आहे.
मेगन बीडेल, शिकागो विद्यापीठ.
बातम्या आणखी आहेत...