आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय वर्षे २६, मात्र वाटतो अवघा दहा वर्षांचा मुलगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - दक्षिण कोरियाचा रहिवासी ह्युम्युंग शिनचा चेहरा १० वर्षांच्या मुलासारखा दिसतो. त्याचा आवाजही लहान मुलासारखाच आहे. असे असले तरी त्याचे खरे वय २६ वर्षे आहे. शिनला एका दुर्धर आजाराने ग्रासले आहे. याला हायलँडर सिंड्रोम नावाने ओळखले जाते. अशा रुग्णाचा शारीरिक विकास आणि वयाची वाढ जवळपास थांबते.

कोरियाच्या पीटर पॅन नावाने प्रसिद्ध शिनच्या कोमल आवाजामुळे लोक त्याला लहान मूलच समजतात. त्यामुळे बर्‍याचदा त्याला ओळखपत्र जवळ बाळगावे लागते. विशेष म्हणजे शिन बिअर पितो आणि डेटिंगवरही जातो. त्याने आपल्या खोलीत हॉलीवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सनचे पोस्टर लावले आहे. एक दिवस सुंदर तरुणीला भेटण्याची इच्छा असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याचे लहानपणीचे छायाचित्र पाहिल्यास तो बालरूपात सामान्य पद्धतीने वाढत असल्याचे दिसत होते. मात्र, किशोरावस्था येईपर्यंत त्याचा शारीरिक विकास थांबला.

१६३ सेंटिमीटर उंची
त्याने एका स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रमात नुकताच सहभाग घेतला होता. त्यात शिन नाचगाणे करत असल्याचे दिसला. आपला कोमल आवाज आणि गोबर्‍या गालामुळे तो सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. १६३ सेंटिमीटर उंच शिन एक महिलेसोबत डेटवर जातो. मात्र, ज्या वेळी तो आपले खरे वय सांगतो, तेव्हा तिला धक्काच बसल्याचे कार्यक्रमात दाखवण्यात आले.

फॅशनची आवड
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याची प्रकृती निरोगी आहे. शिन अन्य मुलांप्रमाणे आपले आयुष्य फॅशनेबल पद्धतीने जगत आहे. लाल जॅकेट आणि बेसबॉल कॅपमध्ये आणखी खुलून दिसतो. मोठे दिसावे यासाठी त्याने पोशाखात बदल करून पाहिला, मात्र तरीही तो लहान मुलासारखा वाटतो.
बातम्या आणखी आहेत...