वॉशिंग्टन - सेलफोन ही धकाधकीच्या जीवनातील एक महत्त्वाची गरज आहे; परंतु त्याच्या बॅटरीची चार्जिंग ही तितकीच मोठी डोकेदुखी ठरते. मात्र, आता अमेरिकेतील संशोधकांनी त्यावर उपाय शोधून काढला आहे. अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेली बॅटरी चार्जिंगसाठी केवळ एक मिनिट एवढाच वेळ घेते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी ही बॅटरी विकसित केली आहे. रिचार्जेबल अॅल्युमिनियमपासून ही बॅटरी विकसित करण्यात आली आहे. सध्या
मोबाइलमध्ये असलेल्या बॅटरी अल्कलिनपासून तयार करण्यात आलेल्या आहेत.
जळण्याचा धोका नाही
अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेली बॅटरी पेट घेत नाही किंवा स्फोटासंबंधीचा धोकाही त्यापासून नाही. तुलनेने अल्कलिन मात्र अधिक धोकादायक असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे ही अॅल्युमिनियमची बॅटरी सर्वांसाठी उपयोगी ठरेल, असे प्रोफेसर हाजी दाई यांनी म्हटले आहे. हाजी स्टॅनफोर्ड विद्यापीठात आहेत.
अपघाताने शोध
बॅटरीसाठी शोध घेताना आम्हाला अपघाताने हा अतिशय सोपा मार्ग सापडला. ग्रॅफाइटचा वापर त्यात करता येऊ शकतो, असे लक्षात आले. हे ग्रॅफाइट मूळ कार्बनच आहे. त्या अगोदर आम्ही ग्रॅफाइटचे काही प्रकार पाहिले होते, अशी माहिती हाजी यांनी दिली.