आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीचा व्यवसाय : प्रतिबंध आणि ओबामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत गोळीबाराच्या घटना घडूनही गनची खुलेआम विक्री होत आहे. इतकेच नव्हे, तर त्यांची मागणीही वाढतेच आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बंदुकीवर प्रतिबंध लावण्याचा मुद्दा उचलून धरला असता; विक्रीत वाढ होतेच आहे. मात्र, कोणी अन्य नेता याची खुलेआम विक्री रोखू शकत नाही, ही गंभीर बाब म्हणावी लागेल. मात्र, या प्रकारामागे अमेरिकेतील काही मुख्य कंपन्या असून त्यांचा या व्यवसायात मोठा हात आहे.


अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅन बर्नेंडिनोमध्ये गोळीबाराची घटना घडली तेव्हा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले होते की, खूप झाले! देशातील तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखले पाहिजे. अमेरिकी तरुणांचा बंदूक खरेदीकडे वाढणारा ओढा त्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय होता. अमेरिकी जनता या धोकादायक मार्गावर जाऊ नये, असे त्यांना वाटत होते. गोळीबाराच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. दर वेळी बंदुकांच्या सर्रास होणाऱ्या विक्रीवर ओबामा यांनी बंदी घालण्याची मागणी केली आहे. मग असे प्रतिबंध लावण्यात का येत नाही? हा प्रश्न उरतो. ज्या कंपन्या बंदुकीचा व्यवसाय करतात त्यांचे राजकीय हितसंबंध आहेत. काही वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचा त्यांना वरदहस्त आहे. या कंपन्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला जातो.

राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी नुकतेच असे म्हटले आहे की, बंदूक खरेदीसाठीचे नियम इतके कडक झाले पाहिजेत की, अतिरेक्यांच्या हातात त्या पडल्याच नाही पाहिजेत. बंदुकांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर काहीच परिणाम होत नाही. कारण ही त्यांच्यासाठी खूप सामान्य बाब आहे. बंदी घालण्याच्या मागणीनंतर स्मिथ अँड वॅसन तसेच रुगर या दोन कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले आहेत. फायनान्शियल सर्व्हिस फर्म बीबी अँड टी कॅपिटलचे विश्लेषक ब्रायन डब्ल्यू रुटेनबर यांनी सांगितले, वस्तुत: राष्ट्राध्यक्ष ओबामा हेच शस्त्रास्त्रांचे चांगले विक्रेते असल्याचे दिसून येते आहे. कारण बंदूक खरेदी करण्यावर बंदी येण्याच्या भीतीने याच्या विक्रीत काही पटींनी वाढच होते आहे.

काही दिवसांपूर्वी कनेक्टिकट येथील सँडी हूक स्कूलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत २६ लोकांचा मृत्यू झाला होता. त्याला ५ दिवस उलटून गेल्यावर बंदुकीची विक्री वाढली नव्हती; परंतु ओबामा यांनी रायफलवर बंदी घालण्याची मागणी केली आणि त्याच्या विक्रीत वाढ झाली. रुटेनबर यांच्या मते, जर तुमच्याकडे टोस्टर नसेल तर त्याची तुम्हाला गरजही पडत नाही; पण टोस्टरच्या विक्रीवर प्रतिबंध येणार असल्याचे समजताच त्याची विक्री वाढू लागते. तुम्हीसुद्धा टोस्टर विकत घेता.

बंदीमुळेच विक्रीत वाढ
न्यू जर्सीमध्ये २०१३ यावर्षी गव्हर्नर क्रिस क्रिस्टी यांनी एक प्रस्ताव दाखल केला होता आणि काही नियम लागू केले. यात बंदूक खरेदी करणाऱ्यांचा पूर्वेतिहास तपासण्यासंदर्भातला नियम होता. तो अमलात येण्याआधीच तेथे बंदुकीची विक्री वाढली. मेरीलँडमध्ये मे २०१३ मध्ये बंदुकीच्या विक्रीवर कडक प्रतिबंध घालण्याची घोषणा झाली. आॅक्टोबर २०१३ पासूनच प्रतिबंध लावण्यात येणार होते. यापूर्वीच अनेकांनी बंदुकी खरेदी केल्या. बंदीचा निर्णय येण्याआधीच विक्रीत वाढ होते, हे यावरून स्पष्ट होते.

न्यू ऑर्लिअन्समध्ये कॅटरिना वादळ आले. त्यानंतर पोलिसांनी लोकांना तेथून हलवताना त्यांच्याकडील परवाना असलेल्या बंदुका मोठ्या प्रमाणावर जप्त केल्या होत्या. या जप्तीच्या निर्णयाविरोधात लोकांनी आमच्यावर झालेला हा अत्याचार आहे, असा आरोप लावला. या भागात बंदुकीची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली होती. आपत्कालीन परिस्थितीत लोकांची शस्त्रे जप्त करू नयेत, यासाठी कन्झर्व्हेटिव्ह नेत्यांनी सरकारवर दबाव आणला. यासाठी काही राज्यांत अशा प्रकारचा कायदा लागू करण्यात आला.

दहशतवादी हल्ल्यानंतर विक्रीत वाढ
{ सप्टेंबर २००१ मधील हल्ल्यानंतर एकाच महिन्यात ७.२ लाख बंदुकांची विक्री झाली.
{ २००८ मध्ये ओबामा यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर एकाच महिन्यात १०.१ लाख बंदुका विकल्या गेल्या.
{ जून २०१३ मध्ये ओबामा यांची राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर सँडी हूक शाळेतील गोळीबाराच्या घटनेदरम्यान २० लाख बंदुकांची विक्री झाली होती.

© The New York Times
बातम्या आणखी आहेत...