इंटरनॅशनल डेस्क- म्हणतात ना प्रेम आंधळे असते. ते ना वय पाहते ना रंग-रुप. असेच एक प्रकरण ब्रिटनमध्ये उजेडात आले आहे. जेथे दोन प्रेम करणा-यांच्या वयातील अंतर पाहून तुम्हाला धक्का बसेल. ब्रिटनमध्ये राहणा-या 72 वर्षाच्या एंजेलाला नायजेरियाच्या एका 27 वर्षाच्या मेट नावाच्या तरूणासोबत प्रेम झाले. एवढेच नव्हे तर दोघांच्या भेटीनंतर तीन महिन्यात एंजेलाने नायजेरियात जाऊन त्या तरूणासोबत लग्नही केले. एंजेलाने हजारदा प्रयत्न करूनही मेटला मेटला ब्रिटनचा व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे एंजेलाला नायजेरियात मेटला भेटण्यासाठी 20 हजार पाउंड (सुमारे 16.5 लाख रुपये) खर्च करावे लागतात. 6 मुलाची आजी आहे एंजेला, तर मेट तिसरा पती...
- इंग्लंडमधील डॉरचेस्टर काउंटी टाउनमध्ये राहणारी एंजेला रिटायर्ड टॅक्सी ड्रायवर आहे.
- इंग्लंडमधील एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एंजेलाने सांगितले की, गेल्या वर्षी फेसबुकवर तिची भेट नायजेरियात राहणा-या मेटसोबत झाली होती.
- यानंतर दोघांचे सातत्याने बोलणे होऊ लागले आणि एकमेंकांच्या प्रेमात पडले. मेटने एंजेलाला प्रपोज केले.
- मेटचे प्रपोजल एक्सेप्ट केल्यानंतर तीन महिन्यांनी एंजेला त्याला भेटण्यासाठी नायजेरियात गेली आणि मेटसोबत लग्न केले.
- या दरम्यान एंजेला सुमारे 20 दिवस मेट आणि त्याच्या कुटुंबियांसमवेत राहिली. मेटने एंजेलाला त्याच्यासोबत राहण्यास सांगितले.
- यानंतर एंजेलाने मेटला व्हिसासाठी अॅप्लाय करायला सांगितले. मात्र त्यावेळी झटका बसला जेव्हा ब्रिटिश एबेंसीने मेटला व्हिसा देण्यास नकार दिला. तसेच यामुळे मेटला ब्रिटिश सिटिजनशिप मिळण्याची आशाही संपली.
- ही अडचण समोर आल्यानंतर आता स्वत: एंजेलालाच नायजेरियात जावे लागते. ज्यासाठी तिला 20 हजार पाउंड ( सुमारे 16. 5 लाख रुपये) खर्च करावे लागतात. एका वर्षात एंजेला मेटला दोनदा भेटायला गेली आहे.
6 मुलांची आजी आहे एंजेला-
- इंग्लंडमधील डॉरचेस्टर काउंटी टाउनमध्ये राहणारी एंजेला 6 मुलांची आजी आहे.
- एंजेलाला पहिल्या व दुस-या पतीपासून झालेली तीन मुले अनुक्रमे 50 वर्ष, 47 वर्ष आणि 43 वर्ष वयाची आहेत. तीनही मुलांना दोन दोन मुले आहेत.
- एंजेला सांगते की, मेटच्या रिलेशनशिपबाबत तिने मोठा मुलगा मॅलकॉमला सांगितले होते.
- मात्र, मॅलकॉमने आईला सांगितले की, नीट तपासून हा प्रकार फसवणुकीचा तर नाही ना. त्यामुळे त्याने मेटचे बॅंकग्राऊंड तपासण्यासाठी आईला मदत केली होती.
- जेव्हा मॅलकॉमला मेटबाबत संपूर्ण बातमी मिळाली तेव्हा कुठे त्याने एंजेलाला मेटला भेटण्यासाठी नायजेरियात जाण्यास परवानगी दिली आणि तेथे गेल्यावर या प्रेमवीरांनी लग्न केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एंजेला आणि मेटचे फोटोज...