आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2400 अमेरिकन नेव्ही सैनिकांचे जपान एअरफोर्सने एका झटक्यात पाडले होते मुडदे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे बेट पर्ल हार्बरवर  7 डिसेंबर 1941 रोजी दुस-या महायुद्धादरम्यान जपानच्या एअरफोर्सने अचानक हल्ला केला होता. त्यात अमेरिकेचे सुमारे 2, 403 सैनिक मारले गेले होते, तर 1,178 जवान जखमी झाले होते. तसेच यूएस नेव्हीची 18 जहाजे तर 328 लढावू विमानेही उध्ववस्त केली होती. पुढे जपानला हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याच्या रुपात या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागले. ब्रिटनचा एक इलेक्ट्रिशियन रॉयस्टन लियोनॉर्डने या हल्ल्याचे काही फोटोज कलराईज्ड केले आहेत. कोणताही इशारा न देता केले कार्पेट बॉम्बिंग....

- 7 डिसेंबर 1941 रोजी सकाळी जपानी बॉम्बर्सनी पर्ल हार्बरमधील यूएस नेव्ही बेसवर कोणताही इशारा न देता कार्पेट बॉम्बिंग केली होती. 
- जपानने दोन फेजमध्ये हल्ले केले होते. त्यासाठी त्यांनी फायटर जेट्स बॉम्बर्स आणि टारपीडो मिसाइल्सचा वापर केला होता. 
- कमांडर मिस्तुओ फुचिदा यांच्या नेतृत्त्वात 183 फायटर जेट्सद्वारे ओहियोच्या पूर्वेला तैनात असलेल्या जपानच्या सहा लढाऊ विमानांनी उड्डाण घेतले होते. 
- त्यानंतर लेफ्टनंट कमांडर शिगेकाडू शिमाकाजी यांच्या नेतृत्त्वात 171 फायटर जेट्सद्वारे पर्ल हर्बरला लक्ष्य करण्यात आले होते.
- हल्ल्यात अमेरिकेच्या आठपैकी सहा युद्धनौका, क्रूझर, डिस्ट्रॉयरसह एकूण 200 हून अधिक एअरक्राफ्ट उध्वस्त झाले होते. 
- जपानच्या एअरफोर्सकडून अचानक झालेल्या या हल्ल्यात अमेरिकेचे 2, 403 सैनिक मारले गेले होते. तर 1,178 जखमी झाले होते.
 
डिप्लोमॅटिक बॅकग्राऊंड आणि नंतर घडला इतिहास-
 
- जपानने यूएस पॅसिफिक फ्लीटचा प्रभाव कमी करण्यासाठी पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. 
- या बॉम्ब हल्ल्याद्वारेच जपानने अमेरिका आणि ब्रिटनच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती.
- अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्क्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी 7 डिसेंबर 1941 हा काळा दिवस असल्याचे म्हटले होते. 
- हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच अमेरिकाही दुसऱ्या महायुद्धात उतरला होता. त्यांनीही जपानच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. 
- जपानला हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याच्या रुपात या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागले.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, पर्ल हार्बर हल्ल्याबाबतची रोचक माहिती....
बातम्या आणखी आहेत...