आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Project Will Support The Development Of Skills In Australia, Add 'Skill India Far reaching Program Of Economic Policy'

कौशल्य विकास प्रकल्पात ऑस्ट्रेलिया मदत करणार , ‘स्किल इंडिया कार्यक्रमाला दूरगामी आर्थिक धोरणाशी जोडू’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न : भारतातील कौशल्य विकास कार्यक्रमात ऑस्ट्रेलिया मदत करण्यास तयार असल्याचे येथील धोरणनिर्मितीतील थिंक टँकने सांगितले. मात्र, यासाठी मूलभूत संशोधनावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
‘स्किल इंडिया’ कार्यक्रमाला एका दूरगामी आर्थिक धोरणाशी जोडण्याची गरज असल्याचे ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचे मत आहे. ४०० दशलक्ष भारतीयांना व्यावसायिक कौशल्य शिकवण्याचे मोठे उद्दिष्ट या कार्यक्रमात ठेवण्यात आले आहे.
२०२२ पर्यंत हे ध्येय साध्य करण्यात येईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिट्यूट (एआयआय)मधील तज्ज्ञांनी मेलबर्नमध्ये याविषयी बैठक घेतली.
कौशल्य विकासाअंतर्गत मूलभूत संशोधनावर भारत भर देणार असेल तर ऑस्ट्रेलिया भारताला सहकार्य करेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सस्टेनेबल स्किल डेव्हलपमेंटच्या (शाश्वत विकास) दृष्टिकोनातून हा कार्यक्रम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत भारतासाठी व्यावसायिक प्रशिक्षणावर केलेला खर्च फारसा लाभदायी ठरलेला नाही, असा अहवाल ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांनी सादर केला. संशोधन आधारित प्रशिक्षणच भविष्यात लाभदायी ठरू शकेल, असे मत त्यांनी मांडले.
बातम्या आणखी आहेत...