आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 किमीच्या अंतरात इतके अडथळे की 10 टक्केच धावपटू ओलांडतात फिनिश लाइन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोवोसिबिर्स्क- तुम्ही आर्यनमॅन ट्रायथलॉनला सर्वात कठीण रेस मानत असाल तर मग तुम्ही रशियन आर्मीकडून आयोजित रेस ऑफ  हीरोजबाबत  ऐकले नसण्याची शक्यता आहे. याचे अंतर अवघे ५ किमीचे असते. मात्र, प्रत्येक खेळाडूला अत्यंत कठीण अडथळ्यांना ओलांडावे लागते. शून्य अंश सेल्शियस २ किमी धावण्यापासून रेसची सुरुवात होते. यानंतर अत्यंत थंड पाण्याचा अडथळा पार करावा लागतो. यानंतर आगीतूनही खेळाडूला  जावे लागते. यानंतरच्या स्टेजला मडी हेल (चिखलाचे नरक) म्हटले जाते. ३०० मी. अंतरापर्यंत पाण्याच्या वर जाळी असते. पाणी आणि जाळीत खूप कमी अंतर असते. खेळाडूंना श्वाससुद्धा घेता येत नाही. यानंतर खेळाडूंना शेकडो टायरच्या ढिगाऱ्यातून मार्ग शोधावा लागतो. रेस संपेपर्यंत ८० टक्के स्पर्धक बाहेर होतात.
बातम्या आणखी आहेत...